२-६-१९३६ धर्मातराने अस्पृश्यांना समानतेचा हक्क प्राप्त होणार आहे - Page 582

५३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ठराव मांडणार.--केरू रामचंद्र जाधव (सोलापूर),

अनुमोदन देणार.--सीमाराम बाबाजी लांडगे (पुणे, आर. एस. फाळके

मुंबई), कु. शांताबाई श्रावण सकाटे (मुंबई), रामचंद्र पुनाजी सकट (दौंड) बाळकृष्ण बडेकर (सातारा), किसन भाऊराव वाघमारे (अहमदनगर).

ठराव २.--मुंबई इलाख्यातील शहरोशहरी असणाऱ्या पोलीस खात्यात पोलीसांकडून जी दवंडी थाळी पिटविण्यात येते त्या कामाकरिता मातंग जातीचां गृहस्थ ठेवण्यात यावा. तसेच खेडोपाडी दवंडी पिटविण्याच्या कामी काही एक वेतन मिळत नसल्यामुळे दवंडी देणारास भरपूर वेतन द्यावे अशी ही परिषद सरकारास विनंती करते.

ठराव मांडणार.--के. एस. सकाटे.

अनुमोदन देणार.--के. एम. काळोखे.

ठराव ३.--मुंबई इलाख्यातील लागवडीस उपयोगी पडणाऱ्या फॉरेस्ट जमीनी आम्हा मातंग समाजास काही ठराविक मुदतीने सारा न घेता लागवडीस द्याव्या व मुदतीनंतर उत्पन्नाच्या मानाने एक चतुर्थांश सारा घ्यावा.

ठराव मांडणार.--के. एम. काळोखे.

अनुमोदन देणार.--शंकरबुवा सकाटे, बाबुराव रामा कांबळे, डी सी. वायदंडे, के जी. कुचेकर, मारूती ज्ञानू तुपसौंदर.

ठराव ४.--मातंग समाजातील ज्या ज्या इसमास दाखले असतील ते दाखले व भिकार हजेरी बंद करून सदरहू जात गुन्हेगार सदरातून वगळून टाकण्यात यावी अशी ही परिषद सरकारास विनंती करते.

ठराव मांडणार.--सीमाराम बाबाजी लांडगे (पुणे)

अनुमोदन देणार.--के. एम. काळोखे, एस के देशमुख, बाबूराव दौलतराव गायकवाड

ठराव ५.--मुंबई इलाख्यातील सरकारी खात्यांमध्ये मातंग जातीच्या लोकास पड्टेवाल्यापासून तो वरच्या अधिकाऱ्यांपर्यंतच्या नोकऱ्या देण्याबद्दल या परिषदेची सरकारला विनंती आहे. |

ठराव मांडणार.--एस. के. देशमुख.

अनुमोदन देणार.--केरू रामचंद्र जाधव. |

ठराव ६.--ग्रहण अमावस्याचे वेळी भिक्षा मागण्यासारख्या व इतर अनेक जुन्या अनिष्ट रूढ्या ताबडतोब बंद कराव्यात अशी ही परिषद मातंग समाजातील रूढीप्रिय बंधुभगिनींना ताकीद देत असून, ह्या अनिष्ट समाजाला काळीमा लावणाऱ्या रूढीचा त्याग त्यांनी न केल्यास त्या व्यक्तीचे गर्हणीय वागणुकीबद्दल मातंग समाजाला विचार करावा लागेल.