धर्मातराने अस्पृश्यांना ....... प्राप्त होणार आहे ५३९
ठराव मांडणांर.--अध्यक्ष.
ठराव ७.--नगर जिल्ह्यातील लोकल बोर्डात मातंग समाजाचा नॉमिनेटेड मेंबर असावा अशी ही परिषद सरकारास विनंती करते.
ठराव मांडणार.--अध्यक्ष.
ठराव ८.--मातंग समाजात शिक्षणाचा प्रसार होण्याकरिता वसतीगृहांची अत्यंत जरूरी आहे. तरी या कामी एक मध्यवर्ती मंडळ स्थापून त्यास वसतिगृह उघडण्याच्या कामी समाजाने सहाय्य करावे. तसेच मातंग विद्यार्थी हितचिंतक मंडळ, मुंबई याससुध्दा आर्थिक मदत करावी
ठराव मांडणार.--डी.सी वायदंडे.
अनुमोदन देणार.--के. जी. कुचेकर, पांडुरंग नाना बडेकर.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले, |
बंधुंनो, |
नुकताच तुम्ही जो धर्मांतराचा ठराव पास केला त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन 'करू इच्छितो. तुम्ही जो ठराव पास केला त्याबद्दल मला आनंद वाटणे अगदी साहाजिक आहे. धर्मांतराची घोषणा ही काही एकाच जातीकरता नसून सर्व अस्पृश्यांकरिता आहे. जेवढ्या अस्पृश्यातील जाती धर्मांतराला अनुकूल होतील, तेवढ्या मला हव्या आहेत. असे जरी आहे तरी धर्मातराविषयी मी आपणापुढे काही बोलू इच्छित नाही. धर्मांतराची साधक बाधक चर्चा जी करावयाची ती मी महार सभेत केलेली आहे. तिची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे असे मला वाटत नाही. दुसरे असे की, धर्मातराचा ठराव तुम्ही आताच पास केला आहे. तेव्हा पास झालेल्या ठरावावर बोलणे निरर्थक आहे. खरे म्हटले असता धर्मांतराच्या ठरावावर तुमच्या सभेत भाषण करावयाची माझी मुळापासून इच्छा नव्हती. मातंग सभेत येऊन मी भाषण करावे अशाप्रकारची सूचना जेव्हा तुमच्या स्वागत कमेटीकडून मला करण्यात आली तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, मला भाषण करण्यास काही हरकत नाही, परंतु मी धर्मातराविषयी सभेत काही बोलणार नाही. त्याचे कारण असे की, सभेत मी धर्मातराविषयी भाषण केले असते व तद्नंतर धर्मांतराचा ठराव करण्यात येऊन तो पास करण्यात आला असता तर क्षुद्र बुद्धीच्या लोकांनी असा गैरसमज पसरविला असता की, माझ्या भिडेमुळे किंवा दडपणामुळे मातंग लोकांनी धर्मातराचा ठराव पास केला. असे जर झाले असते तर तुम्ही केलेल्या धर्मांतराच्या ठरावाला जेवढी किंमत देणे योग्य आहे तेवढी किंमत देण्यात आली नसती व तुमच्या परिषदेचे महत्त्व निष्कारण कमी झाले असते. धर्मातर हे जबरदस्तीने किंवा सक्तीने करता येणे शक्य नाही. त्या बाबतीत भीड घालणे योग्य नव्हे व तिचा उपयोगही होणे शक्य