५४६ डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे
अस्पृश्यातील जातिभेद मोडू शकणार नाही. जातीभेद मोडल्याखेरीज जातीमत्सर निघून जाणार नाही. धर्मांतर हे केवळ महारांचे विशेष कल्याणाकरिता काढलेले आहे अशातला काही भाग नव्हे. सर्व अस्पृश्यांना एका सूत्रात गोवून त्यांच्यातला भेदभाव नाहीसा करून त्यांना सामर्थ्यवान व संघटित करणे हाच धर्मांतराचा मुख्य हेतू आहे. धर्मातर हे एक प्रकारचे अमृत आहे. त्या अमृताने आम्ही शुद्ध होऊ अशी आमची खात्री आहे. परंतु. आम्हीच शुद्ध व्हावे, एवढाच आमचा हेतू नसून मांगांनी व चांभारांनीदेखील धर्मांतराचे अमृत पिऊन शुद्ध व्हावे अशी आमची इच्छा आहे. हे अमृत सर्वांकरिता आहे. तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितल्याप्रमाणे, ' सेवोनिया रस वाटितो अनेका | घ्यारे होऊ नका WARM I असा सल्ला ते तुम्हाला देत आहेत. धर्मातराने तुम्हाला महारांशी रोटीबेटी व्यवहाराचा, समानतेचा हक्क प्राप्त होणार आहे व तो समानतेचा हक्क देण्यास महार लोक तयार आहेत. एवढे औदार्य दुसरा कोणता समाज दाखवू शकेल ? कौन्सिलातील जागा देण्यापेक्षा ही देणगी मोठी नव्हे का? एवढे औदार्य महार जात दाखविण्यास तयार आहे. त्या औदार्याची तुम्हाला जर किंमत नसेल तर तुमचा मार्ग तुम्हास मोकळा आहे. ज्या वाटेने तुम्हास जावयाचे असेल त्या वाटेने तुम्ही खुशाल जा. आमचा उद्धार आम्ही करून घेऊ. त्याकरिता आम्हाला आमची शिरे द्यावी लागली तरी आम्ही देऊ. चांभार-मांगांच्या सामर्थ्याची आम्हाला काही जरूरी नाही. परंतु आम्हाला तसे म्हणावयाचे नाही. महारांना जातीचा अभिमान बाळगावयाचा नाही किंवा आपल्या जातीचे महत्त्व त्यांना वाढवावयाचे नाही. त्यांना जातीभेद मोडून टाकावयाचा आहे आणि सर्व अस्पृश्य जातीचा एक समाज करावयाचा आहे. नुसते मांग म्हणून राहाणे यात काही हशील आहे असे मला वाटत नाही. तुम्ही जर जातीचा खोटा अभिमान बाळगाल तर तुमचा सर्वस्वी नाश होईल, असा इशारा याप्रसंगी देणे मला अगत्याचे वाटते.
वरीलप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाल्यानंतर आभार
प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला.
मुंबई इलाखा मातंग परिषद यशस्वीरितीने पार पाडण्यास व कार्याचा प्रसार करण्याच्या कामी मे. कृष्णा गुंडाजी कुचेकर, रामचंद्र गुंडाजी कुचेकर, यशवंत लक्ष्मण वायदंडे, शंकरबुवा सकटे, बाबू रामा कांबळे, ज्ञानू दाजी इवळे, मारुति ज्ञानू तुपसौंदरे, धोंडीबा तानू कांबळे, केशव धोंडी देवकुळे, गंगाराम सखाराम यादव, लाला पिरा यादव, भागाराम जाधव, लहू लक्ष्मण अल्हाट, केशव धोंडी देवकुळे, हन्या केशव बोताळजे, तुकाराम यशवंत चव्हाण, रत्नाकर खंडूजी आवळे, शंकर नाथा आवळे, निवृत्ती डी. शिंगोणकर, दाजी संतू कांबळे, चिंगाजी वायदंडे, के. डी. वायदंडे, आबा गेणू खंडाळे, लहू अंकूष मोहिते, के. एम. काळोखे,