धर्मातराने अस्पृश्यांना . . . . . . . प्राप्त होणार आहे ५४७
शंकर शिंदे, बाळू सखाराम यादव, एस. के. देशमुख, मार्तड तयापा माने, राऊ मलू माने वगैरे सद्गृहस्थांनी जिवापाड मेहनत करून परिषदेचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल, नायगाव बी. डी. चाळ नं. ४ आणि १३ येथील मुलामुलींनी स्वागतपर गायन सुस्वरात गाईल्याबद्दल त्यांना व त्यांचे शिक्षक रामचंद्र गुंडाजी कुचेकर व पेटी वाजविण्यात प्रविण असलेले मास्टर लक्ष्मण कुचेकर यांना त्यांच्या परिश्रमाबद्दल, मे. कांबळे बँड मास्तर यांनी कुलाब्यातील मुलांना तालीम देऊन त्यांना थोड्याच मुदतीत प्रविण केल्याबद्दल, कुलाबा बँड, कुलाबा स्काऊटस, सैतानचौकी स्काऊटस, वडाळा स्काऊटस, नायगाव स्काऊटस, डिलाईलरोड स्काऊटस यांनी येऊन परिषदेस शोभा आणून उत्तमतऱ्हेची व्यवस्था राखल्याबद्दल, तसेच मुंबई शहरवासीयांनी हे एवढे अवाढव्य कार्य पार पाडण्यासाठी जी शक्तिनुसार आर्थिक मदत केली त्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले, तसेच पुणे, अहमदनगर, दौंड, सोलापूर, कऱ्हाड, नाशिक वगैरे ठिकाणाहून प्रतिनिधी येऊन त्यांनी कार्यास शोभा आणली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.