१६-६-१९३६ भगिनींनो, समाजाला बट्टा लावणाऱ्या धद्यापासून मुक्त व्हा - Page 592

९२३

भगिनीनो, समाजाला बट्टा लावणान्या
धद्यापासून मुक्त व्हा

ता. ३० मे ते १ जून १९३६ ला आयोजित मुंबई इलाखा महार परिषदेत पास झालेल्या धर्मांतराच्या ठरावाचा पहिला आघात कामाठीपुन्यात वस्ती करून राहिलेल्या मुरळ्या, जोगतीणी, देवदासी इत्यादी समाजाने त्याग केलेल्या वर्गावर बसला. साधारणतः या वर्गातील सर्व स्त्रिया सदाचरणाने उदरनिर्वाह करण्यास असमर्थ झाल्यामुळे, अनितीकारक व्यवसायात पडल्या आहेत. महार परिषदेनंतर या स्त्रिया आपल्या परिस्थितीचा विचार करू लागल्या व त्यांनी स्वयंस्फूर्तीने एक खाजगी बैठक बोलाविली व त्यात असे ठरविण्यात आले की, आपल्या व्यवसायातील बायांची व पुरूषांची एक सभा बोलवावी व त्यावेळी डॉ. बाबासाहेबांना आमंत्रण देऊन त्यांच्या मुखातून आपल्या मुक्ततेच्या चार उपदेशपर गोष्टी ऐकाव्या. त्याप्रमाणे देवतांना वाहिलेल्या सर्व वर्गांची, पुरूष (वाघे, पोतराज, भूते वगैरे) व स्त्रिया यांची एक सभा, ता. १६ जून १९३६ रोजी रात्री पोयबावडीवरील दामोदर हॉलमध्ये भरली होती. सभेस स्त्रिया व पुरूष मिळून मोठा लोकसमुदाय जमला होता व त्यामुळे दामोदर हॉल माणसांनी अगदी फुलून गेला होता. आरंभी काही देवदासी, FRSA, पोतराज व वाघे यांची भाषणे होऊन त्यांनी या व्यवसायापासून परावृत्त होण्याची आपल्या बंधुभगिनींना विनंती केली. काही वक्त्यांनी जाहीररितीने असे सांगितले की, आपण या व्यवसायातून पूर्वीच बाहेर पडलो असून आपण प्रामाणिकपणे निढळाच्या घामाचा पैसा मिळवून आपला उदरनिर्वाह करीत असतो व त्यामुळे आपले जिणे स्वाभिमानाचे झाले आहे.

नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या कडकडाटात भाषण करण्यास उठले. त्यांच्या चेहेऱ्यावर त्या रात्री उद्विग्नतेची छाया पसरली होती. त्यांनी भाषणास सुरूवात करताच सभागृहात एकदम शांततेचे व गंभीर वातावरण पसरले. डॉ. आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

आजच्या सभेचे महत्त्व नुकत्याच भरलेल्या महार परिषदेपेक्षा मला शतपटीने अधिक वाटते. समाजाचा जो भाग अत्यंत हीन किवा टाकावू गणला जातो, असा तुमचा समाज आहे. धर्माच्या नावाखाली अनैतिकरितीने आपला निर्वाह करणाऱ्या अशा तुम्ही स्त्रिया आहात. ज्यांचा स्वाभिमान लुप्त झालेला आहे, देह-विक्रय करून पोट भरणे हेच ज्यांचे जीवितसर्वस्व आहे, अशा वर्गाने जगात काय चाललेले आहे हे समजून घेण्याची जिज्ञासा दाखवावी व आपला चरित्रक्रम

जनता : ४ जुले १९३६.