१६-६-१९३६ भगिनींनो, समाजाला बट्टा लावणाऱ्या धद्यापासून मुक्त व्हा - Page 593

भगिनींनो, समाजाला बट्टा ...... मुक्त व्हा ५४९

सुधारण्याची तयारी करावी ही गोष्ट खरोखर तुम्हास भूषणावह आहे आणि म्हणूनच महार परिषदेत २५,००० लोक समुदाय जमला याचे मला महत्त्व वाटत नाही, पण आज तुम्ही जरी ४००-५०० येथे जमला असला तरी त्याचे मला अधिक महत्त्व वाटत आहे. आजच्या तुमच्या या सभेबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो.

एवढ्या प्रस्तावानंतर मी मुख्य विषयाकडे वळतो. आज मुंबई शहरात महार समाजाला कोठे लज्जेने मान खाली घालावी लागत असेल तर तुमच्या कामाठीपुऱ्यातून जाताना. आपल्या भगिनी त्या ठिकाणी इतर समाजाकडून आपली कशी विटंबना करून घेत आहेत हे चित्र डोळ्यासमोर उभे राहिल्याबरोबर प्रत्येक महाराला खेद वाटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आज महार समाजाबरोबर धर्मांतर करण्याची तयारी दाखविलेली आहे, परंतु या तुमच्या निश्चयाने माझ्या अनुयायांची संख्या वाढली म्हणून मला आनंद वाटत नाही किंवा माझ्या धर्मांतराच्या घोषणेस अधिकाधिक पाठिंबा मिळत आहे म्हणूनही मला समाधान वाटत नाही. आमच्या धर्मातराचा अर्थ नीट लक्षात घ्या. आम्ही धर्मातर करीत आहोत ते या दुर्गधीच्या वातावरणातून बाहेर पडण्याकरिता करीत आहोत. सर्वाना समतेचे, बंधुत्वाचे व स्वाभिमानाचे आदर्श जीवित लाभून त्यांचा आयुष्यक्रम उज्ज्वल व्हावा या दृष्टीने आम्ही धर्मातरास तयार झालो आहोत. तुम्हाला जर आमच्याबरोबर यावयाचे असेल, तुमच्या जाती बांधवांबरोबर यावयाचे असेल तर तुम्ही प्रथम हा आपला दुर्गधित आयुष्यक्रम अजिबात सोडून दिला पाहिजे. तुमच्या मलीन वृत्तीचा तुम्हास त्याग केला पाहिजे. हे करण्यास तुम्ही तयार असाल तर तुम्ही आमचेबरोबर या. नाहीतर तुम्ही आमचेबरोबर येऊ नका. वाटल्यास तुम्ही आहात त्याच ठिकाणी रहा. तुम्ही मुसलमान व्हा किंवा खिश्चन व्हा. आमची त्यास हरकत नाही, परंतु जर आमचेबरोबर तुम्हास यावयाचे असेल तर तुम्ही काया, वाचा व मन याची शुद्धी करून व या त्निशुद्धीने शुचिर्भूत होऊनच तुम्हाला आमचेबरोबर येता येईल. नाहीतर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुम्हाला आमचेबरोबर येता येणार नाही.

आणि जर तुम्ही आपला आयुष्यक्रम पूर्ववत चालू ठेवून महार जातीस बट्टा लावण्याचे कार्य सोडणार नाही तर मी तुम्हास बजावून सांगतो की, हजारो तरूण स्वयंसेवक तयार करून मी तुमचे कामाठीपुऱ्यातून उच्चाटन करीन.

'लुम्हाला समजले पाहिजे की स्त्रीजात समाजाचा अलंकार आहे. प्रत्येक समाज स्त्रियांच्या चारित्र्याला अधिक मान देतो. आपली गृहिणी होणारी स्त्री उत्तम कुलातील असावी अशी प्रत्येकजण अपेक्षा करतो व तशी भार्या मिळावी म्हणून खटपट करतो. कारण त्याला माहीत असते की, आपला, आपल्या मुलाबाळांचा, आपल्या कुटुंबाचा व कुळाचा नावलौकिक स्त्रियांच्या शीलावर