५५० डॉ. Warned आंबेडकर लेखन आणि भाषणे
अवलंबून आहे. इतकी थोरवी स्त्रीवर्गाला प्राप्त झाली आहे. परंतु तुमच्या कामाठीपुऱ्यातील चरित्रक्रम पाहिला तर समाजाला व स्त्रीजातीला काळिमा फासण्यासारखा आहे. म्हणून तुम्हा स्त्रियांचे समाजात काय स्थान आहे, हे जाणून आपल्या मलीन आयुष्यक्रमाचा त्याग केला पाहिजे व आपला स्वतःचा आणि जातीचा दर्जा व नावलौकिक वाढविला पाहिजे. तुम्ही कदाचित असा प्रश्न कराल की, हा धंदा आमच्या उपजीविकेचे साधन आहे. इतकेच नव्हे तर या धंद्यामुढेच आज आम्हाला कशाची ददात नाही, आमचे आयुष्य सुखाने चालू आहे. आम्हाला यात नोकर-चाकर वगैरे सुखसोयी आहेत. असा ऐषआरामाचा व थाटाचा चरित्रक्रम सोडून आम्ही काय करावे ? ज्यावेळेस मी तुम्हास हे लाजिरवाणे जिणे सोडण्यास सांगतो त्यावेळेस असेही निक्षून सांगतो की, तुम्हास उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी घेणार नाही. आज हजारो स्त्रिया गरीब नवऱ्याशी लग्न लावून त्यांच्या सहवासात अठराविश्वे दारिद्र्यात दिवस कंठीत आहेत. त्यांना पोट भरण्याकरता हरएक तऱ्हेचे कष्ट करावे लागतात. हजारो स्त्रिया गिरण्या, कारखाने यात नोकऱ्या करून संसारातील इतर हालअपेष्टा सोसून आपल्या मुलाबाळात गरिबीने अर्धपोटीही राहतात परंतु त्या तुमच्या धंद्यात सुख लाभते म्हणून त्यात शिरत नाहीत. त्या तसे का करीत नाहीत? दुःखे का सहन करतात, याचा तुम्ही विचार करा. महाभारतातील कथा तुम्ही ऐकल्या आहेत. ज्यावेळेस पांडव qara हरले त्यावेळी ते वल्कले व मृगचर्म धारण करून वनवासात जाण्यास निघाले. त्यांच्याबरोबर हीच वस्त्रे परिधान करून द्रौपदीदेखील होती. वाटेत, कौरवांपैकी दुर्योधनाने तीस म्हटले; “ द्रौपदी, ह्या मूर्ख नवऱ्यांबरोबर सहवास करून तू आपले हाल का करून घेतेस ? तुझ्या सुकुमार देहाला का कष्ट देतेस ? तू मजबरोबर रहा. मी तुला पूर्ण ऐश्वर्यात ठेवीन व तुला काडीचेही दुःख होणार नाही. “ पण त्या वेळेस मानी साध्वी द्रौपदीने दुर्योधनास जे उत्तर दिले ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. ती म्हणाली, “ जर मला नीतीने आयुष्यक्रम कंठिता येत नसेल तर मला ऐश्वर्य नको. राजवाड्यापेक्षा कष्टमय वनवास मला अधिक प्रिय आहे.” तुम्हीदेखील हाच बाणा बाळगला पाहिजे. तुम्ही कष्ट करण्यास का भ्यावे ? तुमच्या इतर हजारो भगिनींप्रमाणे आपापल्या गावी जाऊन किंवा नोकऱ्या करून काबाडकष्टाने उपजीविका करण्यास तुम्हास का जड वाटावे ? तुम्हाला आपल्या जातीचा अभिमान का नसावा ? हे स्वतःचे विटंबना करणारे व जातीला काळिमा फासणारे जीवित तुम्ही का सोडू नये ? तुमच्या या लांच्छनास्पद gam सबंध महार जातीला किती लाज आणली आहे याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल. पण आम्हाला हरघडी तुमच्यामुळे मान खाली घालावी लागते. काही वर्षांपूर्वी कामाठीपुऱ्यात