१६-६-१९३६ भगिनींनो, समाजाला बट्टा लावणाऱ्या धद्यापासून मुक्त व्हा - Page 595

भगिनींनो, समाजाला बट्टा ..... - मुक्त व्हा ५५१

मी एका सभेला गेलो होतो. त्यावेळेस माझे मित्र डॉ. सोळंकीही हजर होते. शिक्षणाविषयी भाषण करताना मी म्हणालो होतो की, सरकार शिक्षणाच्या बाबतीत मुसलमानांना ज्या सवलती देते त्या अस्पृश्य समाजास देत नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे. त्या ठिकाणी काही मुसलमान गृहस्थ हजर होते त्यापैकी एकाने सांगितले की, '' महारास मुसलमानांविषयी का वैषम्य वाटावे ? आम्ही दोन-दोन, चार-चार महारणी ठेवतो.” या बोचक वाक्याचे प्रत्युत्तर मी दिले नाही, पण या वाक्याने मला किती वाईट वाटले असेल, याची तुम्हीच कल्पना करा. मला कोणत्या गोष्टीची अतिशय चीड येत असेल, ज्या गोष्टीचा अतिशय संताप येऊन तळपायाची आग मस्तकात जात असेल तर या तुमच्या आयुष्यक्रमाची व तुमच्या कामाठीपुऱ्यातील राहणीची | म्हणून मी ` तुम्हास परत एकवेळ बजावून सांगतो की, तुम्हास महार म्हणवून घ्यायचे असेल तर हा गलिच्छ धंदा तुम्हाला एकदम सोडलाच पाहिजे. या धंद्यात राहून मी तुम्हास आमचेबरोबर येऊ देणार नाही आणि इतकेही करून तुम्ही ऐकणार नाही तर मी तुमचा या ठिकाणाहून उठाव केल्याशिवाय राहणार नाही. तरी तुम्ही ताबडतोब जाग्या व्हा व हया हीन चरित्रक्रमाचा त्याग करा.

मला आशा वाटते ती ही की, आजची सभा तुम्ही स्वयंस्फूर्तीने बोलाविली आहे, आपली सुधारणा करून घेण्यास तुम्ही उद्युक्त झाला आहा. तरी ही माझी आशा लवकर सफल होईल अशी इच्छा प्रदर्शित करून मी माझे भाषण संपवितो.

भाषण चालू असता जमलेल्या स्त्रियांची अंतःकरणे सद्गदीत झाली होती. कारण डॉ. बाबासाहेबांचे भाषण अत्यंत स्फूर्तिदायक असे झाले. नंतर सभेतील इतर कार्यभाग आटोपल्यावर सभा बरखास्त झाली.

| | ७ 66