९४
आपणाला यावेळी मोठा समुद्र
ओलांडून जायचे आहे
तारीख ७ सप्टेंबर १९३६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही कामानिमित्त पुण्यास सकाळच्या एक्स्प्रेसने गेले होते. ही एक्स्प्रेस गाडी दुपारी बारा वाजता पुण्यास आली त्यावेळी स्टेशनवर त्यांचे अस्पृश्य पुढारी मंडळीकडून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतार्थ मे. सुभेदार आर. एस. घाटगे, राजाराम भोळे, डी. जी. जाधव, आर. के. कदम, सुभेदार, दुबे, सावंत, मातंग समाजाचे श्री. लांडगे वगैरे मंडळी हजर होती. मातंग समाजातर्फे फोटो व पुष्पहार अर्पण समारंभ झाल्यावर डॉ. बाबासाहेब आपल्या खाजगी कामाकरिता गेले. नंतर त्यांना दीड वाजण्याच्या सुमारास डी. सी. मिशनमध्ये आणण्यात आले. त्यांच्याबरोबर डॉ. सोळंकीसाहेब हेही होते. डी. सी. मिशनमध्ये आगामी असेंब्लीच्या निवडणुकीसाठी विचारविनिमय करण्यासाठी पुण्यातील शंभर दिडशे पुढारी व इतर मंडळी जमली होती. सर्वाशी यासंबंधी चर्चा झाल्यानंतर डॉ. आंबेडकर साहेबांनी अस्पृश्यांकरिता ज्या राखीव जागातील उमेदवारांची जी नावे स्वतंत्र मजूर पक्षातफे जाहीर केली आहेत त्याविषयी आगामी निवडणुकीचे पहिले भाषण केले. ते म्हणाले,
प्रिय बांधवहो,
मी निवडलेल्या उमेदवारांबद्दल जी काही थोडीशी टीका केली जात असेल त्याबद्दल मला मुळीच खंत वाटत नाही किंवा आश्चर्य वाटत नाही. कारणत्या मानाने प्रतिकूल असे मत फारसे दृष्टोत्पत्तीस येत नाही. यावरून माझी उमेदवारासंबंधीची निवड समाजास पसंत पडली आहे, असे म्हणावयास मुळीच हरकत नाही. मी ज्या माणसांची निवड केली त्यात कोणी माझे नातेवाईक, चुलते, मुलगे, जावई किंवा व्याही वगैरे कोणी नाहीत. मी त्यांचा सर्वप्रकारचा विचार करून, तीन गोष्टींची कसोटी लावून त्यात जे कसोटीस उतरले त्यांचीच निवड केली आहे. पहिली कसोटी म्हणजे इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान, कारण तेथे सर्व कामकाज इंग्रजीतूनच चालणार आहे. आपापल्या जिल्ह्यातफे, तालुक्यातले जाच-त्रासादी गाऱ्हाण्यांचे प्रश्न असेंब्लीमध्ये इंग्रजीतून विचारता आले पाहिजेत. म्हणून उमेदवार इंग्रजी जाणणारा पाहिजे. दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे उमेदवार वयाने तरूण असला पाहिजे. म्हाताऱ्या मंडळींना काही तेथे पालखीतून बसवून न्यावयाचे नाही. एखाद्या असेंब्लीच्या समासदाला
जनता : १२ सप्टेंबर, १९३६.