आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जायचे आहे ५५३
असेंब्लीचे कामकाज चालू असताना एखाद्या खेड्यातून निकडीची तार आली तर त्याला तेथे वेळ पडल्यास पायी चालत जाता आले पाहिजे. रात्री-बेरात्री आपल्या जिल्ह्यातील लोकांसाठी फिरता आले पाहिजे. ते कार्य एखाद्या म्हाताऱ्या, संधीवाताने जखडलेल्या कौन्सिलरच्या हातून कदापिही होणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे, आपल्या पक्षाचा उमेदवार पक्षाच्या शिस्तीखाली राहिला पाहिजे. पक्षाच्या नियमानुसार वागून त्याच्या अंगात कार्य करण्याची धमक पाहिजे आणि तो पक्षाकरिता निस्वार्थबुद्धीने काम करणारा पाहिजे. स्वार्थी माणसाला मी कवड़ीचीही किंमत द्यायला तयार नाही.
तुमच्या fora निवडलेले श्री. राजाराम भोळे यांचे उदाहरण घ्या. त्यांच्यापेक्षा कोणताही जास्त शिकलेला व तितका लायक मनुष्य पुण्यात नाही, मला भाऊबंदकीकडे किंवा जिल्ह्याच्या दुराभिमानाकडे अथवा वतनदारीकडे लक्ष द्यावयाचे नाही. नुसत्या नावावर लायकी किंवा महत्त्व अवलंबून नाही. तर ते कामावर अवलंबून आहे. श्री. भोळे जर बिनविरोध निवडून आले तर आपल्या पदरात एकंदर तीन जागा पडतील. त्यांना जर विरोध नसला तर ते सहज निवडून येतील व त्यांना न दिल्या गेलेल्या मतांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार निवडून येईल आणि दुसऱ्या भागात देखील आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या दुसऱ्या भागातील मतांनी सर्वसाधारण निवडणुकीत निवडून येईल. अशा- तऱ्हेने आपण शिस्तीने वागलो तर आपणास एकट्या पुण्यात तीन जागा मिळविता येतील. तेव्हा आपण तालुक्याचा, गावचा किंवा जिल्हयाचा दुराभिमान सोडून तुम्ही आपल्या पक्षाच्या हिताकरिता लायक माणसालाच निवडून दिले पाहिजे. कौन्सिले म्हणजे म्हारकी नव्हे की, बाप मेला म्हणजे ती मुलाला मिळेल |
सध्या माझी प्रकृती ठीक नाही. ब्लडप्रेशर झाले असल्यामुळे, थोडे अंतर देखील चालून जाता येत नाही. तेव्हा प्रत्येक ठिकाणी जाऊन मला शंकाकुशंका सोडवावयास वेळ सापडणार नाही. माझ्या कसोटीस उतरलेल्या उमेदवारांच्या विरूद्ध जर कोणास काही करावयाचे असल्यास ते त्यांनी नीट विचार करून आणि जबाबदारी ओळखून करण्याचे धाडस करावे. मी त्यांच्या स्वार्थी कृतीची चूक सिद्ध करून दाखवीन. दिवसेंदिवस माझ्या शिरावर अनेकप्रकारच्या जबाबदाऱ्या येऊन पडत आहेत. आपल्या समाजाच्या स्वातंत्र्याच्या कार्यात मला हितशत्रू उत्पन्न झालेले आहेत. या आजच्या लढ्यात माझ्यावर कोणते प्राणांतिक प्रसंग उत्पन्न होतील ते मलाच सांगता [येत ] [नाहीत. ] अशाही बिकट परिस्थितीत मी तुम्हाबद्दलची सर्वप्रकारची जबाबदारी घ्यावयास तयार आहे. माझ्यावर विशवास असेल तर तुम्ही मी निवडलेल्या [लायक ] [माणसालाच ] आपली मते देऊन निवडून आणून समाजाचे [हित ] [साधावे. ] सगळ्याच ठिकाणी