७-९-१९३६ आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जायचे आहे - Page 598

Quy डॉ. बावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

म्हाताऱ्यांना जर हक्क आहे तर सगळी म्हाताऱ्यांचीच भरती होईल. मला स्वतःलाही कोठेच जागा राहणार नाही. माझ्यापेक्षा सुभेदार घाटग्यांनी ५० वर्षे जास्त काम केले आहे. श्री. शिवराम जानबा कांबळ्यांनी ६० वर्षे जास्त काम केले आहे. त्यांच्या वयाच्या मानाने मला देखील काम करता येणार नाही. तेव्हा या असल्या वादविवादात मला पडण्याचे काहीच कारण नाही. जोपर्यंत तुमचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी तुमचे पुढारीपण स्वीकारीन. आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जावयाचे आहे. तेव्हा मी म्हणेन तेच नावाडी व चांगली नाव मला मिळाली पाहिजे. तरच मी नावेत पाय टाकीन. मोडकी नाव व कुचकामाचे नावाडी दिलेत तर मी नावेत मुळीच पाय ठेवणार नाही. मलाही तुमचा पुढारीपणा नको आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी पूर्णपणे ध्यानात ठेवा की प्रत्येकाला लायकी पाहिजे. ' नामसे नही कामसे है ' ही गोष्ट लक्षात ठेवा.

७ 6 ©