८-१०-१९३६ अंध व स्वार्थी दृष्टी ठेवली तर सर्व समाजाचाच घात होईल - Page 601

अंध व स्वार्थी. . .... समाजाचाच घात होईल पुपुए

इंग्रजी न जाणणाऱ्यांचा येथे उपयोग नाही. आम्हाला आमच्या मोजक्या खुर्च्या शोभवावयाच्या नाहीत. आम्हाला कार्य करावयाचे आहे. आज त्यांच्याइतका शिकलेला इसम तुमच्या जिल्ह्यात दुसरा नाही. तो बी. ए. झाला आहे. तो काही माझा नातेवाईक नाही किंवा तो त्याचा भत्ता मला देणार नाही. मी तुमच्याच फायद्याकरिता त्याची निवड केलेली आहे. मी काही पक्षपात केला नाही. मी सर्व सारासार विचार करून व पूर्वखानदेशचा नकाशा माझ्या नजरेसमोर ठेवून श्री. जाधवांची निवड केली आहे आणि मी पुन्हा सांगतो की तो लायक आहे.

तुम्ही म्हणाल की अडाणी मराठे व कुणबी कोन्सिलमध्ये जातात. त्यांना कुठे इंग्रजी येते ? जर त्यांचा इसम चालतो मग आमचा का नको? पणमी तुम्हास असे सांगतो की मराठे, कुणबी आणि तुमच्यात जमीन अस्मानचे अंतर आहे. त्यांना सर्वकाही अनुकूल आहे. त्यांना कोठलीही उणीव नाही. पण तुम्ही कंगाल आहात . तुम्हास सर्व काही कष्टाने प्राप्त करावे लागते आणि ते सुलभरितीने प्राप्त करावयाचे असेल तर wea कायद्याने मिळविता येणे शक्‍य आहे. एवढ्याकरिता तुमचे मूर्ख उमेदवार चालणार नाहीत, तज्ञ हवे आहेत कारण तुमची ग्रहदशा काढून टाकावयाची आहे आणि म्हणूनच श्री. जाधवरावासारख्या लायक उमेदवारास तुम्ही निवडून देणे तुमचे कर्तव्य आहे. जर तुम्ही तसे न कराल तर तुम्ही स्वतःचा नाश करून घ्याल, ही मी तुम्हाला आजच धोक्याची सूचना देतो. जर एखाद्याने मूर्खपणा केला तर तुम्ही तो करू नका. एकाने चोरी केल्यास दोरी बांधून फुकट मरू नका. आज दोन हजार वर्षापासून तुमचे पूर्वज या हिंदुस्थानात आहेत. पण कोणकोण ब्राह्मणाच्या मांडीला मांडी लावून बसले होते ? तो भाग्योदय आज तुम्हाला प्राप्त झाला आहे आणि अशावेळी जर तुम्ही अंघ व स्वार्थी दृष्टी ठेवली तर सर्व समाजाचाच नव्हे तर स्वतःच्या बायका-मुलांचा घात कराल. म्हणून मी या सर्व मंडळीतफे मे. मेढे-बिऱ्हाडे यांना विनंती करतो की तुम्ही समाजाच्या आड [येऊ ] नका व विनाकारण गोंधळ करू नका. पण इतकेही सांगून त्यांनी ऐकले नाही तर तुम्ही काय कराल ? तुम्ही मला विरोध कराल काय ? (सर्वत्र आवाज नाही ! नाही !! नाही !!!) समाजाचा घात कराल ? [(फिरून ] [नाही-नाही) ] [मग ] काय कराल ? तुमच्या भागात ५,००० मतदार आहेत, प्रत्येकाला मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे आणि त्याचा तुम्ही योग्य तोच उपयोग केला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे व सर्व समाजाचे [कार्य ] [उत्तम ] [व्हावे ] असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे [कर्तव्य ] [करा ] [आणि ] [सर्वांनी ] [वाटेल ] [ती ] खटपट करून श्री. जाधवाला निवडून आणा. फुटकी नाव व कुचकामाचे नावाडी देऊन ती नाव पैलतीरावर [न्या, ] [असे ] [जर ] [तुम्ही ] [म्हणत ] [असाल ] [तर ]