८-१०-१९३६ अंध व स्वार्थी दृष्टी ठेवली तर सर्व समाजाचाच घात होईल - Page 602

५५८ डॉ. वावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

त्या नावेला मी केव्हाही पैलतीराला नेणार नाही. इतकेच नव्हे तर त्या नावेत पायदेखील ठेवणार नाही. म्हणून मी सांगेन तेच नावाडी मला दिले पाहिजेत. तरच मी त्या जहाजाला सहजरीत्या पार नेईन. शेवटी तुम्ही श्री. जाधवालाच निवडून आणावे अशी मी तुम्हास विनंती करतो.

यानंतर श्री. वारभूवन यांनी डॉ. साहेबांनी जो अमूल्य उपदेश केला तो सर्वांनी लक्षात ठेवून व श्री. जाधव यांना निवडून देणेबद्द एक जलसा खेडोपाडी नेण्याचे जाहीर केले.

७ ७ ०