८-११-१९३६ ज्या वक्षाच्या छायेखाली गुण्यागोविदाने बसावयाचे आहे त्या छायेच्या फांद्या तोडण्याचा दुष्टपणा करू नका. - Page 603

९६
ज्या वृक्षाच्या छायेखाली गुण्यागोविंदाने बसावयाचे
आहे, त्या छायेच्या फांद्या तोडण्याचा

दुष्टपणा करू नका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोव्हेंबर १९३६ मध्ये विलायतेला गेले. त्यापूर्वी त्यांनी जनता, दिनांक ७ नोव्हेंबर १९३६ मध्ये जाहीर केल्यानुसार रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर १९३६ रोजी सकाळी ९ वाजता दामोदर हॉल, परेल, मुंबई येथे समता सैनिक दलाची एक जाहीर सभा बोलाविली होती. या सभेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करावयास उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ते आपल्या भाषणात म्हणाले,

मी उद्या काही जरूरीच्या कामकाजाकरिता विलायतेला जात आहे. माझ्या गैरहजेरीत आपणास फार मोठी जबाबदारीची कामगिरी बजावायची आहे. आपणास ठाऊक आहेच की नवीन राज्यघटनेनुसार आपल्या अस्पृश्य समाजाला कायदे मंडळात १५ राखीव जागा मिळाल्या आहेत. त्या कायदे मंडळाची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होईल. आपणास मिळालेल्या या पंधरा जागा या इलाख्याच्या निरनिराळ्या जिल्ह्यात विभागल्या गेल्या आहेत. या जागांकरिता मी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षातफे निरनिराळ्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकी लढविण्यासाठी मी व माझ्या सहकारी मित्रमंडळींनी मिळून हा स्वतंत्र मजूर पक्ष का स्थापन केला याचा खुलासा प्रथम करतो. काँग्रेससारखी बलाढ्य व सुसंघटित संस्था या देशात असताना ही नवीन संस्था काढण्याची आवश्यकता का भासली याचे उत्तर अगदी सरळ आहे. काँग्रेसचे मुख्य ध्येय म्हटले म्हणजे स्वातंत्र्य मला व माझ्या सहकाऱ्यांना हे ध्येय मान्य आहे, परंतु ते साध्य करणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे. त्याला सत्याग्रहासारखे गांधीजींचे शस्त्र बोथट पडणारे आहे. कायदे भंगानेही सरकारकडून स्वातंत्र्य मिळविता येणे अशक्य कोटीतली-विशेषतः शक्तिबाहेरची- गोष्ट आहे, असे प्रत्येकाला वाटत आहे. असे असूनही आपण निष्फळ स्वातंत्र्याची वल्गना करण्यात काय अर्थ आहे ? जोपर्यंत खरेखुरे स्वातंत्र्य मिळविण्याची अंगी धमक नाही तोपर्यंत सनदशीर मार्गाने आपल्या ध्येयाचा मार्ग गाठणे अधिक हिताचे आहे, असे आमचे प्रामाणिक

जनता : ५ डिसेंबर, १९३६.