८-११-१९३६ ज्या वक्षाच्या छायेखाली गुण्यागोविदाने बसावयाचे आहे त्या छायेच्या फांद्या तोडण्याचा दुष्टपणा करू नका. - Page 604

५६० डॉ. बाबासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे

मत आहे. तशात हिंदुस्थान हे एक राष्ट्र नाही. या देशात निरनिराळ्या ४,००० जाती आहेत. या निरनिराळ्या जातींच्या बंडामुळे जातिभेद, प्रांतभेद, तंटे, बखेडे आणि धर्मभेदाचे गंभीर प्रसंग, यामुळे एकी होणे अशक्य आहे. हिंदू, मुसलमान व ख्रिस्ती यांचे एकच ध्येय नाही. समजा आजच्या परिस्थितीत इंग्रज सरकारचे छत्र नाहीसे झाले तर ज्यांना एकराष्ट्रीयत्वाचे ध्येय मान्य नाही, असे जात्याभिमानी आणि धर्माभिमानी लोक आपापसात झगडून स्वतःच्या हाती राजकीय सत्ता घेण्याचा प्रयत्न करतील.

दुसऱ्या बाजूनी विचार करता काँग्रेस व आमचा पक्ष यात पुढीलप्रमाणे भेद आहे. काँग्रेसला आजच्या नवीन सुधारणा अपुऱ्या वाटतात आणि यासाठी कायदे मंडळात जाऊन या सुधारणांच्या निषेधार्थ ती मंडळे मोडून टाकणे आवडते. परंतु आम्हाला या सुधारणा अपुऱ्या वाटत असूनही कायदे मंडळात जाऊन या सुधारणान्वये कार्य करून अधिकाराच्या बळावर अधिक हक्क मिळविण्याचा सतत प्रयत्न करणे आम्हाला आवडते. कायदे मंडळे मोडून पोरखेळ खेळत राहण्याचे आजचे दिवस राहिले नाहीत. खरे स्वातंत्र्य मिळविण्याची जी खरी शक्ती ती आपल्या हाती नसताना-तितकी अंगी धमक नसताना- स्वातंत्र्याचे हवेत मनोरे बांधणे शेवटी अपायकारक ठरतील. तशात काँग्रेस हे एक कडबोळे आहे. तिच्यात बेकार, मजूर, भांडवलवाले, सावकार, शेतकरी, कुळे, जमीनदार, लहानमोठे व्यापारी, मध्यमवर्ग वगैरे परस्परविरोधी हितसंबंधांच्या लोकांची एक मोट आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ही एक flom आवळ्यांची मोट आहे. रक्त शोषण करणाऱ्यांची व रक्त शोषण केले जाणाऱ्यांची मित्र म्हणून कशी सांगड घातली जाणार? आज काँग्रेस धनिकांच्या मगरमिठीत बसली आहे. ती गोरगरीब, कामकरी व शेतकरी जनतेचे कोणते हित करणार ? काँग्रेस ही संस्था शेतकरी-कामकरी वर्गांची संस्था नाही. ती भांडवलदारांची पाठीराखी आहे. तिच्या हातून बहुजन अशा श्रमजिवी लोकांचे हित होणे कठीण आहे. त्याच्या उलट आमचा स्वतंत्र मजूर पक्ष हा निर्भेळ वर्ग तत्त्वाच्या पायावर उभारलेला आहे. आम्हाला जितके कामकरी व शेतकरी वर्गाचे हितरक्षण जिव्हाळ्याने करता येईल तितके काँग्रेसला करता येणे अगदीच अशक्य आहे. पददलित, गोरगरीब अशा श्रमजिवी वर्गाचे हितरक्षण व संवर्धन करणे हेच आमच्या पक्षाचे मुख्य कार्य आहे. तत्त्वांच्या बाबतीत तडजोड न करता कायदे मंडळातील कोणत्याही पक्षाशी तपशीलाच्या बाबतीत योग्य प्रसंगी सहकार्य करू. तसेच मी अस्पृश्य समाजाला सोडून इतर जातींच्या लोकांशी सहकार्य करून संगनमत का केले, अशाप्रकारचा प्रश्‍न मला विचारण्यात येतो. त्यासंबंधी सांगायचे म्हणजे असे की, नवीन राज्यघटनेनुसार स्थापन होणाऱ्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये एकंदर १७५ सभासद निवडून