ज्या वृक्षाच्या छायेखाली ....... दुष्टपणा करू नका ५६१
जाणार आहेत. या १७५ सभासदांमध्ये आपले अस्पृश्य समाजाचे १५ सभासद असणार. या पंधरा जणांच्या मदतीने कुणाला काहीच काम करता येणे शक्य नाही. यासाठी आपल्या मदतीला जास्त लोकांची. आवश्यकता आहे आणि हे लोकसुद्धा आपल्याच विचारसरणीचे व आपले मित्र असेच पाहिजेत. यासाठी ज्या ज्या स्पृश्य माणसांनी आजपर्यंत आपुलकीने सहाय्य केले, ज्यांनी आपल्या समाजकार्यासाठी स्वार्थत्याग केला अशा मनुष्यांना आपण निवडून देऊन आपल्या पक्षात सामील करून घेणे आवश्यक आहे. यासाठी यापुढे आता निष्कारण तर्ककुतर्क काढून वेळ गमावू नका. आमच्या पक्षातर्फे ज्या कार्यक्रमाची आखणी केली आहे ती पार पाडण्यासाठी आपापसातील भांडणे, तंटे, मारामाऱ्या वगैरे अनिष्ट प्रकार बाजूला ठेवा. . शिस्तीला व तत्त्वाला जागून वागलात तर आज माझ्या हातून आपल्या समाजाकरिता जे अल्प प्रमाणात काम करता आले आहे ते अधिक प्रमाणात करून घेण्याची मला प्रबल अशी शक्ती प्राप्त होईल. तत्त्वाकरिता व शिस्तीकरता लढता लढता मी कायदे मंडळाच्या निवडणुकीत पडलो तरी हरकत नाही. परंतु मुंबई जी वार्ड व उपनगर विभागातर्फे उभे राहिलेले आपले उमेदवार मि. काळोखे यांना तुम्ही निवडून आणले पाहिजे. त्यातच. तुमचे कल्याण आहे. त्यातच तुमची सारी अब्रू आहे. यावेळी महार-मांग हा जातीभेद मानू नका. आपण यापुढे सर्व एकच आहोत, ही उज्ज्वल भावना हृदयात निरंतर जागृत ठेवा. | | o |
आता मी दुसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्याकडे वळतो. तो म्हणजे : मी सर्वच उमेदवार महार जातीचे निवडून इतर समाजाच्या लोकांना उभे केले नाही, हा होय ! खरे पाहिले म्हणजे या बाबतीत आम्ही अधिक खोलात जाऊ नये, हे बरे ! तरी पण आज ज्यांनी राष्ट्रीय हरिजन पक्ष काढून या आरोपाला तोंड फोडले आहे त्यांना उत्तर हे दिलेच पाहिजे. या राष्ट्रीय हरिजन पक्षवाल्यांना मी एकाच नावाने संबोधू इच्छितो. हे लोक ' लेभागू ' लोक आहेत. यांना चांभार म्हणून मी माझ्या पक्षातून वगळले नाही. त्यांनी त्याप्रमाणे वाटेल ती ओरड करावी , त्याची मला बिलकूल कदर नाही. त्यांची निवड न.करण्यात . त्यांचा ' लेभागूपणाच ' कारणीभूत झाला आहे. जिथे मिळेल तिथे जायचे. तत्वाची-शिस्तीची यांना कधीच जाणीव नसावयाची. मिळेल ते ओटीत टाकून स्वतःकरिताच घेऊन जायचे, हाच त्यांचा धर्म ! आम्ही महाड सत्याग्रह केला, स्वावलंबनाच्या निरनिराळ्या चळवळी केल्या, नाशिक सत्याग्रह केला, फार कशाला पुणे-करार प्रसंगाचे उदाहरण घ्या. आम्ही तत्त्वाकरिता प्राणावर बेतेपर्यंत काँग्रेसशी व तिचे पंचप्राण गांधीशी झगडत असता हे राष्ट्रीय हरिजनवाले अगदी अचूक आमच्या शत्रूच्या कँपात बसलेले ! अशा लेभागू