२० डॉ. कनत वाबासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे
आज हिंदुस्थानात स्वराज्य wie जे वादविवाद होत आहेत त्यात मुख्यत्वेकरून ब्रिटिश लो काच्या हाती असलेली सत्ता क्रमाने काढावी की, एकदम काढून घ्यावी याच प्रश्नावर रागळा भर दिला जातो. काढून घेतलेली सत्ता कोणाच्या संमतीने वापरण्यात यावी याचा कोणीच विचार करीत नाही. समजा प्रत्यक्ष आलेली सत्ता जर एकाच वर्गाच्या संमतीने अंमलात आणली गेली तर, आज ब्रिटिश आमदानीत जी स्थिती आहे तिच्यापेक्षाही दसपटीने वाईट होणार नाही कशावरून ?
यास्तव सत्तेच्या प्रश्नाइतका किंबहुना तिच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा असा हा संमतीचा प्रश्न आहे आणि ज्याअर्थी आमच्यातील स्वराज्यवाद्यांनी तो मुद्दा गौण म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले आहे, त्याअर्थी त्यांना जनअपवादाची किती पर्वा आहे हे उघड आहे. आपण मात्र या प्रश्नाचा पिच्छा पुरविला पाहिजे. कारण स्वराज्य जर येणार, तर त्यात आम्हास इतरांसमान अधिकार पाहिजे आणि तसा अधिकार प्राप्त होण्यास आपण मतदानाचा जो राजकीय हक्क तो प्राप्त करून घेतला पाहिजे. हल्ली मतदानाचा हक्क इतका संकुचित करण्यात आला आहे की, साऱ्या हिंदुस्थानात शेकडा दोन लोक यासच तो प्राप्त झाला आहे असे मी समजतो. याने आपला दोपदरी फायदा होणार आहे. एक तर आज कायदे कोन्सिलातफ जी आपली हेळसांड होते ती होणे शक्य नाही. जे लोक आपण मत दिल्यामुळे निवडून येतील त्या लोकांना आपल्या हिताविषयी बेपर्वा राहून चालावयाचे नाही. कारण आपल्या हाती त्यांची लगाम राहणार आहे. मतदानाच्या हक्कापासून आपला एवढाच फायदा होणार आहे असे नाही. त्यापासून दुसरा एक महत्त्वाचा फायदा आहे व तो हा की, या मतदानाच्या हक्कापासून वर्णाश्रम धर्मावर मोठाच घाला येणार आहे. राजकीय बाबतीत समान आश्रम झाल्यावर सामाजिक बाबतीत वर्णाश्रम धर्म राहणे शक्य नाही. आज राजकीय बाबतीत एका ब्राह्मण उमेदवारास जर भंग्याजवळ मतांची भीक मागण्याची पाळी आली तर वर्णाश्रम धर्म राहिला कोठे ? असा हा रंकाचा राव होण्याचा राजमार्ग आपण आधी अवलंबिला पाहिजे. इंग्लंडातील मजुरांची तरी काही वर्षापूर्वी आपल्या प्रमाणेच हीनदीन स्थिती होती. १८६० पर्यंत लिबरल लोक आपला उद्धार करतील अशा आशेने ते स्वस्थ बसले होते. “ परी जो दुसऱयावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला व जो प्राणपणानी कष्टत गेला, तोचि भला || " याची जाणीव पटून त्यांनी आपला उद्धार आपणच करण्याचे ठरविले या त्यांच्या कार्यात त्यांनी मतदानाच्या हक्कास प्रधान पद दिले होते व तो हक्क प्राप्त करून घेण्यास त्यांनी आपली सर्व शक्ती खर्च केली. अखेर त्यांचा जय होऊन आज ते राज्यारूढ झाले आहेत व आपल्या मनाप्रमाणे सामाजिक, राजकीय व आर्थिक सुधारणा घडवून आणित आहेत. याचे मूळ कारण