समाणज वनात निरपक्ष कर्तव्य वुद्धीने झटले पाहिजे २१
म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क GG प्रमाणात प्राप्त झाला आहे, हेच होय. आपण जर तशा SH यत्न कला तर आपणासही आपली उन्नती करून घेता येइल.
पण जे ध्येय आपण आपल्यापुढे ठेवतो त्या ध्येयाला आधारभूत असणारी तत्त्व आपल्या प्रतिपक्षापुढे मांडून कार्यभाग होल नाही हे आपण विसरता कामा नये. कोणताही एखादा प्रसंग गुदरला म्हणजे ज्या लोकांवर तो प्रसंग गुदरतो ते लोक प्रथमतः तत्त्वावर वादविवाद करीत सुटतात. जो तो आम्ही माणसे नाहीत काय, कुत्री, मांजरं, आमच्यापेक्षा श्रेष्ठ का आहेत, अशा प्रकारच्या तत्त्वाचा वादविवाद घालतात, यात खरोखरीच काही वावगे नाही पण कित्येक लोकांना असे वाटते की तत्त्वांची माळ गोविली की, आपला कार्यभाग झाला व आपण जिकलो. पण हा भ्रम आहे. निव्वळ तत्त्वाची उभारणी करून चालत नाही. कारण तत्त्वाची उभारणी झाल्याबरोबर त्याचा परिणाम जगाच्या राहाटीवर आपोआप होत नाही. तो परिणाम घडवून आणावा लागतो. म्हणून परिणामाच्या दृष्टीने तत्त्वे मांडण्यापेक्षा ती अंमलात आणण्यास योग्य अशी संघटना तयार करणे त्याहीपेक्षा अगत्याचे आहे. जोपर्यंत संघटना तयार झाली नाही तोपर्यंत ज्या तत्त्वासाठी आपण झगडत आहोत, ती तत्त्वे आपल्या प्रतिपक्षाला कबूल जरी असली तरी ती पुराणातली वांगी पुराणातच ठेवण्यात रोतील व आपले म्हणणे अरण्यरुदनाप्रमाणे शुष्क ठरेल. ज्याप्रमाणे नशीबाचा गाडा हाकण्यास यत्न-सारथी असावा त्याप्रमाणे तत्त्वांचा इष्ट परिणाम घडवून आणण्यास संघटनाही असावी लागते.
यावरून पाहता मला वाटते, आपल्यात संघशक्ती उत्पन्न करण्यास आपणास एक सर्व अस्पृश्य जातीस व्यापक अशी संस्था असणे फार जरूर आहे. अशी संस्था उत्पन्न झाली पाहिजे. या संस्थेमार्फत आपली दोन कार्ये होतील. एक आपल्याला सार्वजनिक कामाला लागणारा पैसा गोळा करण्यास सुलभ होईल. ' दरिद्र्याचे मनोरथ उपजल्या बरोबरच लयास जातात ' अशी एक म्हण आहे व आमचा समाज गरीब असल्यामुळे आमच्या हातून हा कार्यभाग कसा होईल असा बहुतेकांना संदेह वाटतो. पण माझ्या मते ही म्हण फार तर व्यक्तिमात्रालाच लागू पडते. समाजाला लागू नाही. थेबे थेंबे तळे साचे ' अशी दुसरीही म्हण आपल्या ऐकिवात आलीच अरोज. आपला समाज जरी गरीब आहे तरी तो संख्येने जबर आहे. आपल्यातील चोवीस लक्ष लोकांपैकी किमान दोन लाख गाणसांनीच जर दरवर्षी आठ आणेच दिले तर दरवर्षी एक लाख रुपयाचा फड तयार होईल आणि अशा प्रकारे दरवर्षी एक लाख रुपये जर जमा होत गेले तर आपली उन्नती होण्यास मुळीच अवधी लागणार नाही, मात्र याला एक मध्यवर्ती संस्था असणे जरूर आहे. अशा जबाबदार संस्थेकडून कायम