५-१९२४ समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे - Page 64

२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

फंड गोळा करण्याचे काम होईल इतकेच नव्हे तर आपले धोरण निश्चित करून ते लोकनिदर्शनास आणण्यास सोपे जाईल. आज आमची स्थिती अशी आहे की, ज्याला ज्याला म्हणून र ट फ करता येते त्याला आपण पुढारी आहो असे वाटून आपले नाव पुढे यावे असे वाटते. इतकेच नव्हे तर कोणी संस्थेमार्फत काम करावयास तयार नसतात. कारण संस्थेत राहिल्याने त्यांचे नाव पुढे येत नाही. अशामुळे आमच्यात बाराभाईची नगरी होऊन गेली आहे वजोतो आपले नाव पुढे येण्यास काही तरी प्रुफ नाचवीत असतो. दुसरे असे आहे की, आम्ही जरी या देशात वास्तव्य करीत आहो, आम्हावर नाना तऱ्हेचे अन्याय लादण्यात येत आहेत, आम्ही काही अल्पसंख्यांक नाही, तरी सरकार आमची काही दाद लावीत नाही किंवा आमचे काही म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही. उलट त्यांना वाटले तर ते आमची कीव करतील किंवा पाव तुकडा टाकतील. मागू म्हटले तर आमचा हक्क चालावयाचा नाही एवढी आमची दुर्भिक्षता. त्याच मुसलमान लोकांचे कोण लाड ! याचे कारण त्यांची संघशक्ती आणि त्यांच्या संस्था ! आपली जर अशी एखादी संस्था असती तर आपल्यातील खोट्या पुढाऱ्यांस आळा घालून त्यांची एकदिशा करती, इतकेच नव्हे तर इतरांकडून जी आपली बेदाद होते व बेफिकीरी दाखविण्यात येते ती तशी येती ना |

या संस्थेने फंड गोळा करून आपल्या अस्पृश्य वर्गाची आतील सुधारणा करण्यास सुरुवात करावी. नुसती अस्पृश्यतेविरुद्ध तक्रार करून उपयोग नाही. आपण विसरतो की, आज हिंदू समाजात जो जातीभेद आहे, त्याचबरोबर त्यामध्ये गुणभेद आहेतच आणि जातिभेद जरी गेला तरी गुणभेद हा राहणार आहेच. आज सर्व अस्पृश्य वर्गातील लोकास जरी ब्राह्मण म्हणून संबोधिले तरी, त्यातील कोणी मनुष्य ना. परांजपे यांच्या जोडीला जाऊन बसण्यास लायक होणार नाही. कारण जातीभेद जरी गेला तरी गुणभेद राहिला आहे. मला तर केव्हा केव्हा असे वाटते की, जातीजातीत जो गुणभेद वाढला आहे, तो जर वाढला नसता तर हा जातीभेद इतक्या दिवस टिकलाही नसता. कारण साऱ्या जातीतील लोक सारख्या प्रमाणात जर गुणवान असते तर त्यांनी एका जातीचे वर्चस्व केव्हाच कबूल केले नसते. गुणभेद जर नसता तर जातीभेद केव्हाच जमीनदोस्त झाला असता. म्हणून मला नेहमी सांगावेसे वाटते की, इतर लोक आपणापेक्षा जसे जातीने श्रेष्ठ आहेत तसे ते व्यावहारिक गुणानेही श्रेष्ठ आहेत. म्हणून आपण आपल्या लोकांच्या अंगी व्यावहारिक गुणांची अभिवृद्धी करण्यास प्रयत्न केला पाहिजे आणि आमच्यातील लोकांना जातीभेदामुळे जाळपोळ होत नाही व आपल्यावरील अन्याय दूर करण्यास ते धिंगा घालीत नाहीत याबद्दल आपल्यातील काही लोकास सखेदाश्चर्य वाटते; पण यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. अमुक एक गोष्ट करता येत नाही वगैरे आवेशयुक्त बोल ऐकून