५-१९२४ समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे - Page 66

२७ डा. वावासाहेव आबेडकर लेखन आणि भाप

आपल्यात संघशक्ती उत्पन्न केली तर आपण जे माग त आणल्याला मिळेल. माझी खात्री आहे की, या संग्रामात जे हिदू लाक आज तिसाव्या शतकात अस्पृश्यता काढा असे म्हटले असता घूळ खात Vere) पुरणार विचारतो असे म्हणतात, तेच लोक ती पुराणे जाळून आपल्याला एकवट करून घेतील. वेळच तशी आली आहे. त्याला नाइलाज आहे.

आपला समाज आज सर्वतोपरी मागासलेला आहे. द्रव्याने मागासनेला आहे, मनोधेर्याने मागासलेला आहे. ज्या समाजातील लोकास राजकीय, सामाजिक व धार्मिक असमता व अन्याय यापासून पराकाष्ठेचा त्रास होत आहे. ज्यातील साऱ्या लोकास गूढ अज्ञानाने व्यापिले आहे, ज्यास विपत्तीपासून होणाऱ्या यातना सोसाव्या लागत आहेत व त्याच्या परिहारार्थ काय करावे समजत नाही, त्या लोकांची सर्वत्र चाललेल्या जीवनकार्यात अखेर गती काय होईल हे सांगता येणे फार कठीण आहे. यासाठी आपल्यापैकी ज्यांना ही स्थिती स्पष्टपणे कळत असेल व ज्याच्या मनात कर्तव्यबुद्धी व परोपकारबुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल, त्यांनी आपल्या समाजाचा जीवनार्थं कलहात टिकाव लागण्यासाठी रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीने झटले पाहिजे. अशा प्रकारचे विचार समजले असून ' ते जर स्वस्थ राहतील, तर त्यांच्या माथ्यावर आपल्या दडपून गेलेल्या बांधवास विपन्नावस्था आणिल्याची आणि त्यांचा नाश केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे. म्हणून सुशिक्षित बांधव हो। जर तुम्हास इतरांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणवून घ्यावयाचे असेल व तुमची आज जी स्थिती आहे ती दूर करून तुमच्या मुलांची व नातवंडांची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हास वास्तविक इच्छा असेल तर ज्या दुर्गतांनी व दुराचारांनी आपल्या लोकांच्या बुद्धीचा, कीर्तीचा व परिस्थितीचा घात चालविला आहे. त्यांचे यथाशक्ती निर्मूलन करणे हे आपले कर्तव्य आहे व ते आपण केले पाहिजे हे सांगून मी आपली सर्वांची रजा घेतो.