& १
घनघोर संग्राम केला तरच
माणुसकी परत मिळेल
बहिष्कृत हितकारिणी wad जिल्ह्यातून लोकजागृतीसाठी सभा भरविण्याचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्रर केला. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी गावी ' मुंबई इलाखा पांतिक बहिष्कृत परिषद; अधिवेशन तिसरे ' ही सभा बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली दिनाक १०-११ एप्रिल १९२५ रोजी भरविली. परिषदेला संवोधित करताना दिनांक ११ एप्रिल १९२५ रोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
या देशात आजकाल ज्या घडामोडी चालल्या आहेत त्यात आपल्याला अत्यंत जिव्हाळ्याची बाब म्हटली म्हणजे वैकम येथील सत्याग्रह ही होय ! म्हणूनच वैकम येथील सत्याग्रहावरून जे विचार मला सुचले आहेत ते मी आपणापुढे मांडीत आहे.
वैकम येथे कसला वाद चालू आहे हे बहुतेकास विदित आहेच. ज्या रस्त्यावरून सर्व लोकांना व जनावरांना जाता येते त्या रस्त्यावरून आपणासही जाता यावे, असा आग्रह वकम येथील अस्पृश्यांनी धरला आहे. या सत्याग्रहात ज्या काही रदबदल्या घडल्या त्या सर्वांचे आपल्याला फारसे प्रयोजन नाही. ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की हा सत्याग्रह वर्षाधिक कालपावेतो चालून अखेर निष्फळ झाला. या सत्याग्रहासंबंधाने काही राजकीय पुढाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला आहे, ही गोष्ट खरी आहे. कारण आधी राजकीय मग सामाजिक, ही मीमांसा अगदी नादानपणाची आहे, हे आता सिद्ध झाले आहे. कारण आज इतके दिवस नुसते राजकारण शिजत घातल्यानंतर जर राजकीय ध्येयाच्या आड कोणती बाब येत असेल तर ती सामाजिकच होय. सामाजिक प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की, त्याला कितीही भिजत पडू दे म्हटले तरी तो प्रश्न दत्त म्हणून पुढे उभा राहतोच. ज्या राजकारणी धुरंधर पुरुषांनी सामाजिक प्रश्न वाजूस ठेवून नुसते राजकारण हाती घेतले व इतरास घेण्यास लाविले त्यांनी काहीच साधले नाही. इतकेच नव्हे तर सामाजिक प्रश्न बाजूस टाकल्यामुळे त्यांच्या राजकीय ध्येयाची साध्यता त्यांची त्यांनीच विकट करून टाकली. यास आजची परिस्थिती साक्ष दत आह. तो सामाजिक प्रश्न त्यांनी वेळीच हाती घेतला असता तर आज सर्वत्र दिसून येत असलेली तेढ व
डॉ. = भी. रा. आंबेडकर i चरित्र चरित्र : mt चां १ भ जः खैरमोडे. वैरः पारेर TTS खंड -r २, पृष्ठ पुष्ठ १२१-१२६. 5 ~