२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दुही दृष्टीस पडती ना! ही तेढ व दुही नाहीशी करण्यास या देशात घडत असलेले सामाजिक अन्याय दूर करणे हे अव्वल महत्त्वाचे कार्य आहे व ते दरेक हिंदी जनाने आपले पवित्र कर्तव्य म्हणून बजावले पाहिजे, असे सांगणारा मुत्सद्दी या देशात महात्मा गांधींपूर्वी कोणीच झाला नाही. त्यांच्या मते सामाजिक व राजकीय या बाबी दोन नाहीत त्या एकच आहेत आणि म्हणूनच हिन्दू-मुसलमानांचे ऐक्य व अस्पृश्यता निवारण या दोहोशिवाय स्वराज्य मिळणार नाही, असे ते नेहमी सांगत फिरतात. बारीक नजरेने पाहिले असता ज्याप्रमाणे कस्तुरबा गांधी व लक्ष्मी यांच्यामध्ये सापत्नभाव आहे, त्याप्रमाणे महात्मा गांधी व अस्पृश्यता यांच्यामध्येही थोडासा सापत्नभाव आहे असे म्हणावे लागते. कारण ते जितका खादीप्रसार व हिन्दू-मुसलमानांचे ऐक्य यावर भर देतात, तितका अस्पृश्यता
Amma देत नाहीत. तसा जर त्यांनी दिला असता तर ज्याप्रमाणे
काँग्रेसच्या बाबतीत सुतावाचून मत नाही, असा त्यांनी हट्ट धरला त्याप्रमाणे अस्पृश्यता निवारणावाचून काँग्रेसमध्ये शिरकाव नाही, असाही आग्रह त्यांना धरता आला असक्ष. असो ! जेथे कोणीच जवळ करीत नाही तेथे महात्मा गांधींनी दर्शविलेली सहानुभूती काही कमी नाही. या त्यांच्या सहानुभूतीप्रमाणे वैकम येथील सत्याग्रहाची काहीतरी वासलात लावावी म्हणून ते स्वत: वैकम येथे गेले होते व त्यांनी तेथील ब्रह्मवृंदांपुढे तडजोडीच्या तीन सूचना मांडल्या. त्यांनी सांगितले 'की (१) एकतर जनतेचे लोकमत घ्या, (२) दुसरे ज्या शास्त्रात अस्पृश्यता सांगितली आहे ती खरी की खोटी हे पंडितांमार्फत ठरवून घ्या, अगर (३) त्रावणकोरचे दिवाण यास सरपंच नेमून निवडक पंडितांच्या पंचामाफत ही बाब लवादांत काढा. पण सखेदाश्चर्याची गोष्ट ही की हे तिन्ही अनुमतीचे मार्ग तेथील ब्रह्मावृंदांना मान्य झाले नाहीत. त्यांनी अस्पृश्यांना मज्जाव करण्याचा आपला निश्चय ढळू दिला नाही; इतकेच नव्हे तर अस्पृश्यांस हा अन्याय आहे असे म्हणणाऱ्या महात्माजीपुढे कोणतेही शास्त्र ठेवून दिले.
ही हिंदूंची शास्त्रे मी काही वाचून पाहिलेली नाहीत व त्यांच्या पोटात काय काय कोडी साठविलेली आहेत त्याची मला माहिती नाही. माझी खात्री आहे की त्या शास्त्रात अस्पृश्यता सांगितलेली आहे. परंतु व्यवहारात अस्पृश्यता पाळणे हा धर्म आहे, असे आमचे धर्ममार्तंड निधड्या छातीने सांगतील असे मला वाटले नव्हते. याचा उघड अर्थ असा की आम्ही एकतर सगळी शास्त्रे जाळून राख केली पाहिजे अगर शास्त्रे चाळीत बसून अस्पृश्यतेसंबंधी जे निर्णय असतील ते खोटे ठरवित बसले पाहिजे व ते निर्णय जर आम्हाला फोल ठरविता आले नाहीत तर आम्हाला अस्पृश्यता ही आदीअंतापावेतो भोगावी लागणार आहे. असाच जर आमच्या धर्ममार्तडाचा दुराग्रह असेल तर या शास्त्रांची विल्हेवाट अगदी