११- ४-१९२५ घनघोर संग्राम केला तरच माणुसकी परत मिळेल - Page 70

z डों. वावासाहेच आंवेडकर लखन आणि मापण

जो नप, उतत. गणे जदहलना, इतकी जवरदरण जरा आम्हायर ह | जाह तचरा आम

नुवयासारखे Pad आडी ५ गायीप्रमाण गरीब झालो आहोत. आम्हाला त्याच काही दु दुःख नाह, as नाहा, जाणाव नाही. नवल जाह त हच. लहान सहान मुंगीयर जरी पाय दिला तरी ती डसते. पण आम्ही किड्याएवढे मोठ प्राणी असता आम्हाला कोणी लाथा मारल्या असता देखील आम्ही उलदून पडत नाही, याची कारणे शोधून पाहू गेलो असता मुख्यतः दोन दिसतात. एक आपल्यात ज्ञान व शहाणपण नाही. ही ज्यांच्याजवळ होती त्यांनी त्यांच्या कळवर आपल्या लोकांवर जुलूम केला व अमुकच नियमाबरहुकूम वागावे असे आपल्या सल्ल्यावाचूनच ठरवून आम्हावर तसे वागण्याविषयी अन्यायाने सक्ती केली. हे सर्व आपल्या कर्तव्यकर्माची हयगय केल्याची फळे आपण भोगीत आहोत आणि आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. आपले माणुसकी रूपी धन दुसऱ्यांनी हरण केले, त्यांना योग्य वेळीच शिक्षा केली असती तर आज आपल्या लोकात दृष्टीस पडत असलेली अत्यंत शोचनीय व नीच अवस्था आपणास कधीही प्राप्त झाली नसती; व या सुवर्णभूमीत अन्नात्रगत होऊन लाजिरवाण्या तोंडाने दुसऱ्याची याचना करण्याचाही प्रसंग आपणावर कधी आला नसता. परंतु अन्यायाचा प्रतिकार करण्यास सज्ज होण्याऐवजी आम्ही जुन्या चालीरीतीस कवटाळून अगदी खंगत चाललो आहोत. आमच्यात काही प्राण उरला नाही, आम्ही निस्तेज झालो आहोत. असे होण्याचे कारण हेच की मुलांच्या संबंधाने आईबापांची कर्तव्यकर्मे काय आहेत, याकडे आपल्या लोकांनी पाहिजे तितके लक्ष पुरविले नाही. नसत्या जबाबदाऱ्या आपल्या डोक्यावर घेतल्यामुळे व त्या हव्या तशा हातून न वठल्यामुळे आपल्यातील आईबाप मुलांच्या नाशास कारणीभूत होतात. आपल्यात बापाने मुलाचे लग्न केलेच पाहिजे ही नसत्या जबाबदारीपैकी एक जबाबदारी आहे. लग्न करून संसाराची जमवाजमव होते न होते तो इकडे मुलांची परंपरा सुरू झालीच. चारपाच वर्षात एक दोन पारे जयदत्त म्हणून पुढे उभी । ती वाढली न वाढली तो त्यांची नवीन भावंडे त्यांच्या पाठीवर पाय देऊन आली ! पहिल्यांची लग्ने होत आहेत नाहीत तो मागल्यांची येऊन ठेपली. "मग पोरांच्या पोराची काळजी । हा प्रकार वरिष्ठ लोकातही आहे, पण याचे अनिष्ट परिणाम जितके आमच्या लोकास भोवलात तितके ते त्याना भोवत नाहीत. याचे कारण असे की जरी ते लोक लग्न

TAJA काम आपल्या शिरावर घेतात तरी त्याबरोबर जेणेकरून मुलगः सवावत वी व त्याच्यावर लादलेला प्रपंच आणि त्याच्यावर येणारी प्रजोत्पादनाच व पालनाची जोखीम घेण्यास सामर्थ्यवान होईल, अशाप्रकारचे शिक्षण त्यास देण्याची काळजी घेतात. आमच्यातील लोक मुलांचे लग्न करून देण्यापलीकडे काही करीत नाहीत. एकतर कर्ज काढून लग्न करावयाचे. मुलगा अडाणी