घनघोर संग्राम केला तरच माणुसकी परत मिळेल ३१
तसे जर आपण केले नाही तर काळ बदलेल पण आपल्या स्थितीत मात्र बदल होणार नाही. विधायक कार्य केल्याशिवाय इतका वेळ गेला आहे की जास्त वेळ जाऊ देणे हे आपल्या Fa होणार नाही. या प्रांतातील आपल्या लोकात शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नाही. त्याचप्रमाणे तंबाखूचा या प्रांतातील बहुतेक सर्व व्यापार आपल्यातील लोकांच्या हाती आहे व तो इतका आहे की दरेकाने मोठ्या पाटीस आठ आणे दिले तर दरसाल पाच सहा हजार रुपये मिळू शकतील. हा योग जर साधून आला तर या प्रांतात पंधरा, वीस मुलांचे बोडिंग उत्तमप्रकारे चालू शकेल असे मी ऐकतो. ही सूचना आपल्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी ध्यानात घ्यावी अशी माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे. जर त्यांनी विनंतीस मान दिला तर तुम्ही परिषद भरविल्याचे व मी आल्याचे सार्थक झालेसे होईल.