a ‘ जनतेची `
मी माझ्या आंधळ्या जनतेची काठी आहे
सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे १९२६ च्या मे महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. डॉ. आंबेडकर मुंबईहून रहिमतपूरला आले व महारवाड्यातील तक्क्यात मुक्काम ठोकून राहिले. शिवतरकर, वनमाळी, गायकवाड, खोलवडीकर, खंडकर, जावळे इत्यादी मुंबईची मंडळी, कृष्णराव कदम, मा. सा. गायकवाड, जनार्दन रणपिसे, धर्माजी सावंत वगैरे पुण्याचे लोक आणि फलटणचे माधवराव अहिवले वगैरे सातारा जिल्ह्यातील लोक अधिवेशनासाठी आले होते. अधिवेशनाला दुपारी ३ वाजता सुरवात झाली, त्यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती धनजीभाई कूपर. एज्युकेशनल अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सीताराम रामजी तावडे, मामलेदार दुदुस्कर, रामचंद्र ग. सोमण, वकील वगैरे अधिवेशनास हजर राहिले होते. बहिष्कृत वर्गातील योग्य इसमास जे. पी. करावे असा एक ठराव होता. या ठरावाला सोमणांनी विरोध केला. देशात स्वातंत्र्य मिळविण्याची चळवळ चालली आहे आणि बहिष्कृतवर्ग सरकारने पदव्या व किताब आम्हाला द्यावेत अशी विनंती करून देशाच्या गुलामगिरीला पाठिबा देत आहे, हे ठीक नव्हे, असा त्यांच्या विरोधी भाषणाचा सारांश होता. सोमणांचे भाषण संपताच साहेब ताडकन उठले, त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला
होता. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
हिंदू समाजातील पांढरपेशे लोक आणि विशेषत: ब्राह्मण लोक यांनी आपल्या देशबांधवांना धर्माच्या नावाने आपल्या पायाखाली चेपून ठेवले व हेच लोक हिंदू मुसलमान आणि इंग्रज राज्यकर्त्यांचे पाय चाटून ऐषारामी जीवन जगत आले. याच लोकांनी स्वार्थाधपणे आपल्या धर्मबांधवांना व देशबांधवांना परक्याच्या व स्वतःच्या गुलामगिरीत डांबून ठेवले व ही गुलामगिरी त्यांनीच पाचशे वर्षे टिकवून ठेवली आणि आता हेच लोक राजकीय गुलामगिरीविरुद्ध बकवा करीत आहेत. हेच लोक काँग्रेसच्या झेंड्याखाली जमा होऊन राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देहदंड सोसण्यास तयार आहेत. हेच लोक अस्पृश्यांना सामाजिक व धार्मिक समता देण्यास तयार नाहीत. या लोकांनी संपूर्ण देशाचा व जनतेचा सर्वतोपरीने सत्यानाश केला आहे. या माझ्या विधानाची कोणाला ऐतिहासिक माहिती हवी असेल तर ती मी देण्यास तयार आहे. माझे हे म्हणणे खोटे आहे असे येथे कोणाला सांगावयाचे असेल तर त्याने ते सांगावे. ते मी खोडून काढण्यास तयार आहे. अस्पृश्यांच्या हातात सत्ता व
डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड २, पृ. १४९-५०-५१.