३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
याच संस्थेने एक प्रश्नमालिका तयार केली होती; तीत सामाजिक सुधारणा केल्याशिवाय तुम्हाला राजकीय सुधारणा मागण्याचा काय अधिकार आहे, असा पक्ष मांडला होता. यावरून संस्थेत किती जोम होता हे दिसून येते. १८९८ साली सर हरबर्ट रिसले साहेबांनी जेव्हा हिंदी लोकांच्या रितीरिवाजाची संकलित माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले होते त्यावेळी सदर साहेबांनी आपल्या प्रश्नांची यादी या संस्थेकडेही पाठविली होती यावरून संस्थेस सरकारकडून विचारपूस करण्याइतक्या महत्त्वाची ही संस्था होती हे स्पष्ट होते. हे सर्व मी पुराव्यानिशी सांगू शकतो; कारण या संस्थेचे सर्व कागदपत्र हल्ली माझ्या ताब्यात आहेत. परंतु ही सभा रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे स्थापन झाली, त्यावरून उघड आहे की अस्पृश्योन्रतीची चळवळ प्रथम सुरु केल्याचा मान जर कोणास द्यावयाचा झाला तर तो या संस्थेस आणि या प्रांतास देणे प्राप्त आहे. या संस्थेच्या चालकांनी संस्थेच्या माफत फक्त ASA दूर करण्याचे काम केले असे नाही. लेखनाद्वारे जागृती करण्याचे कामही त्यांनी पुष्कळच केले. सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू जोतीबा फुले यांचे खरे साथीदार व उत्साही शिष्यांपैकी बरेचसे या संस्थेच्या चालकांपैकी होते. एकाच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय माझ्याने राहवत नाही ते गृहस्थ म्हणजे कै. गोपाळबुवा वलंगकर हे होत. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे जी जागृती केली ती अनुपम आहे. ज्यांना ती पाहावयाची असेल त्यांनी 'दीनबंधु' च्या जुन्या फाईली वाचून पाहाव्यात म्हणजे कळेल.
अशी ज्या लोकांची ऐकेकाळी उन्नत स्थिती होती त्या लोकांची आजची स्थिती किती अवनत झाली आहे? तारतम्य दृष्टीने जर पाहू गेलो तर या प्रदेशातील अस्पृश्य वर्गाची स्थिती इतकी खालावली आहे की, त्यांच्याइतके दरिद्री, अशिक्षित व मूढ लोक इतर प्रदेशातील अस्पृश्य वर्गात नाहीत असे म्हणण्यास काहीच प्रत्यवाय नाही. या प्रांतातील अस्पृश्य वर्गाच्या स्थितीत असा खेदकारक व शोचनीय फेरफार कसा झाला; हा एक गूढ प्रश्न आहे. याचे नेहमी देण्यात येणारे उत्तर असे आहे की, ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांची लष्करात भरती करण्याचे बंद केल्यापासून हा अनर्थ ओढवला आहे, या म्हणण्यात पुष्कळसा खरेपणा आहे याबद्दल मला मुळीच शंका नाही. राजकीयदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या अथवा आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रजाजनास सरकारी नोकरीत बंदी करणे अन्यायाचे आहे. अस्पृश्य समाजातील लोकास लष्कर भरतीतून बंद करणे हे पक्षपातीपणाचे लक्षण तर आहेच पण हे विश्वासघाताचे त्याचप्रमाणे मित्रद्रोहाचेही लक्षण आहे असे म्हणावे लागते. अस्पृश्यांच्या सहाय्याशिवाय ब्रिटिश सरकारचा या देशात केव्हाच प्रवेश झाला नसता, मराठेशाहीचे उच्चाटन इंग्रजांना कसे करता आले याची इतिहास संशोधकांकडून अनेक कारणे देण्यात येतात. कोणी मराठेशाहीत माजलेला जातीभेद हे एक कारण देतात; कोणी मराठेशाहीत