जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका ३९
आपापसात वाढत असलेली तेढ व दुही हे कारण देतात. पण यापैकी एकही कारण खरे नाही असे माझ्या अल्पमतीस वाटते. मराठ्यांमध्ये जातीभेदामुळे किंवा दुहीमुळे दौर्बल्य वाढले होते तर इंग्रज लोक काय सामर्थ्यवान होते? खरे म्हटले असता ज्या काळी इंग्रजांनी हा देश काबीज करून घेतला त्यावेळी इंग्लंड देशाला नेपोलियनने ' दे माय धरणी ठाय ' करून सोडले होते. इतके की हिंदुस्थानात राज्य करीत असलेल्या त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीस त्यांना द्रव्यबलाची वा सैन्यबलाची मदत करणे अशक्य होते. उलटपक्षी नेपोलियनच्या
- तडाख्यातून सुटका करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीपासून द्रव्यबलाची व सैन्यबलाची मागणी केली. हिंदुस्थानात इंग्रजांची अशी दुर्बल स्थिती असताना त्यांनी हा देश कसा काबीज केला याचा उलगडा मराठ्यात तेढ होती किंवा दुही होती या म्हणण्याने होत नाही. मला असे वाटते की याला समाधानकारक असे एकच उत्तर देता येईल, ते हेच की या देशात येऊन एतद्देशीय लोकांचे सैन्य जर इंग्रजांना उभारता आले नसते तर हा देश त्यांना केव्हाच पादाक्रांत करता आला नसता. यावर आमच्या दयाळू व न्यायप्रेमी इंग्रज सरकारास मी अशी सूचना करतो की त्यांनी आपणा स्वतःला असा प्रश्न विचारावा की या एतद्देशीय सैन्यात कोणाचा भरणा होता? व ते जर आपले जुने दप्तर तपासून पाहतील तर त्यांना दिसून येईल की या त्यांच्या सैन्यात अस्पृश्यांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. तेव्हा हे उघड आहे की, अस्पृश्यांचे बळ जर इंग्रजांच्या पाठीमागे नसते तर हा देश त्यांना केव्हाच काबीज करता आला नसता. ज्या लोकांनी सैन्यात भरती होऊन देश हस्तगत करून दिला त्याच लोकांची सैन्यातून हकालपट्टी व्हावी हीं न्यायाची तम्हा मोठी मासलेवाईक आहे असे म्हणणे भाग आहे. इंग्रज लोक कसे कार्यसाधू लोक आहेत याचे दुसरेही एक उदाहरण नुकतेच घडलेले आपणा सर्वांस विदित असेलच. १९१७ साली सुरू झालेल्या महायुद्धाच्या प्रसंगी आमच्या सरकारला पुन्हा अस्पृश्यवर्गाची आठवण झाली. आमच्या अस्पृश्यवर्गाची पलटणीत शिरण्याची उत्सुकता नेहमीच अनावर असते. एका पलटणीपुरती मागणी होती पण दोन पलटणी होतील इतकी माणसे आपखुषीने तयार झाली. सरकारने एक पलटण उभी केली. एकदा झालेली बंदी उठवून पुन्हा लष्कर भरती सुरू झाली याबद्दल सर्वानाच आनंद वाटला. या प्रांतातील अस्पृश्यांच्या भाग्योदयास पुन्हा प्रारंभ झाला अशी आशा वाटू लागली. परंतु लढाई संपल्यानंतर काटकसरीच्या नावाखाली पलटण कमी करण्यात आली! या सरकारच्या ताल बेताल वर्तनास काय म्हणावे हे समजत नाही ! सद्गृहस्थ हो! माझे असे मत आहे की, आम्ही सरकारला नेहमी अनुकूल असतो, म्हणूनच सरकार आमची नेहमी उपेक्षा करते. सरकार देईल ते घ्यावयाचे, सांगेल ते ऐकावयाचे, ` ठेवील तसे राहावयाचे अशी जी आमची दास्यत्त्वाची वृत्ती होऊन गेली आहे, तीच