जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका ४१
अस्पृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बी कधीही रूजणार नाही. हल्लीच्या स्थितीत त्यांच्या खडकाळ मनावर कसलेही नवे रोप उगवणार नाही. त्यांची मने अशा रीतीने सुसंस्कृत होण्यास त्यानी पांढरपेशाचा अवलंब केलाही पाहिजे. अस्पृश्यांनी पांढरपेशाचा अवलंब करावा असे मी का म्हणतो यास दुसरेही एक कारण आहे. सरकार ही एक मोठी जबरदस्त महत्त्वाची संस्था आहे. सरकार ज्याप्रमाणे मनात आणील त्याप्रमाणे सर्व काही घडून येईल. पण आपण हे विसरता कामा नये की, सरकार कोणत्या गोष्टी घडवून आणील हे सरकारी नोकरांवर सर्वस्वी अवलंबून राहील. कारण सरकारचे मन म्हणज सरकारच्या नोकरांचे मन. यावरुन एक गोष्ट सिद्ध आहे ती ही की, जर सरकारकडून आपल्याला आपल्या हिताचे असे काही करवून घ्यावयाचे असेल तर सरकारी नोकरीत आपला प्रवेश आपण करून घेतला पाहिजे. नाही तर आपली जशी आज हेळसांड होत आहे तशी ती नेहमीच होणार आहे. ती न व्हावी हा जर आपला हेतू असेल तर अस्पृश्य वर्गाच्या लोकांनी सरकारी नोकरीत आपला जास्त प्रमाणात शिरकाव होईल अशी व्यवस्था करावयास पाहिजे. त्याशिवाय त्यांना उजित अवस्था केव्हाच यावयाची नाही आणि सरकारी नोकरीत शिरकाव होण्यास पांढरपेशा पत्करल्या खेरीज चालावयाचे नाही. ह्या गोष्टीचे महत्त्व मुसलमान व मराठे या जातीनी ओळखीले आहे आणि या बाबतीत त्यांची मोठी धडपड चालली आहे. आपणही वेळीच जागे होऊन आपला शिरकाव करून घेतला पाहिजे. ब्राह्मण लोक या चळवळीची निंदा करतात आणि सरकारी नोकरीत काही नाही म्हणून सांगत फिरतात. परंतु या त्यांच्या म्हणण्यात सत्यही नाही व प्रामाणिकपणाही नाही. सत्य नाही याचे कारण असे की सरकारी नोकरीचा अधिकार या प्रांतातील ब्राह्मणांच्या हाती जर नसता तर इतर प्रांतातील ब्राह्मणाप्रमाणे ते पाणके किंवा स्वयंपाकी झाले असते. येथील ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व नुसत्या पुराणाच्या आधारावर असते तर इतर ठिकाणाप्रमाणे कधीच ढासळले असते पण त्याला सरकारी नोकरीच्या अधिकाराचा पाठिंबा असल्यामुळे ते टिकले आहे. जसा असत्य तसा हा युक्तीवाद दिशाभूल करणारा आहे. कारण ब्राह्मणांनी सरकारी नोकऱ्यांचा काही अभिलाष सोडला नाही. उलट त्यांची चिकाटी आहे ती आहेच. तेव्हा त्यांच्या असत्य व अप्रामाणिक युक्तीवादाला आपण फसून जाता कामा नये.
सद्गृहस्थ हो ! या प्रसंगी मला एका खेदकारक गोष्टीची आठवण करून देणे भाग पडत आहे. मी मागे सांगितले आहेच की हा प्रदेश सुभेदार, जमादार यांनी गजबजलेला होता व या लोकांनी अनेक उपयुक्त गोष्टी केल्या. पण एक गोष्ट केली नाही व ती जर केली असती तर ती आपल्या सर्वांच्या कामी आली असती. ती गोष्ट हीं की, त्यांनी आपापल्या मुलास शिक्षण दिले नाही. सद्गृहस्थ हो ! हे लोक काही गरीब नव्हते. त्यांच्या कालाच्या मानाने त्यांना फारच मोठे पेन्शन मिळत असे, त्यांनी मनात जर आणले असते तर