१९-३-१९२७ जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका - Page 88

४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

(क) खाजगी संस्थांनी चालविलेल्या बोर्डीगास मुलापाठी प्रत्येकी दरमहा

रु. १० ग्रँट द्यावी.

(ड) ३० मुले असलेल्या गावी शाळा उघडावी.

(इ) शिष्यवृत्त्या द्याव्या.

गट 30

ठराव १ ला.--ही परिषद बहिष्कृत वर्गातील पंचांना पाटलास ( वरठ्यास ) विनंती करते की मुलांच्या लग्नप्रसंगी ठिकठिकाणच्या पंचांनी खालील गोष्टी अंमलात आणाव्या.-

(अ) २० वर्षाच्या आतील मुलांची व १५ वर्षाच्या आतील मुलींची लग्न करण्याची चाल बंद करण्यात यावी.

(ब) ज्या ठिकाणी शाळा असेल तेथील लोकांनी मुलामुलीस शिक्षण दिलेच पाहिजे अशी पंचांनी ताकीद द्यावी. मोडल्यास दोषास पात्र व्हावे लागेल असा नियम करावा.

(कं) पुनर्विवाह करण्यापूर्वी उभयता वधुवरांची योग्य चौकशी केल्याशिवाय पुनर्विवाह लावू नये.

(ड) पुनविवाहामध्ये सात रुपये इलोग द्यावा. आणि लुगडेचोळी, पाटल्याचा जोड़, नथ व पंचाचे जेवण .याशिवाय पंचांचा कर नसावा.

ठराव २.-- (अ) अस्पृश्य लोकांनी महारकी वगैरे सारखे हलके धंदे करण्याचे सोडून शेती वगैरे सारखे स्वतंत्र धंदे करण्याची पद्धत जोराने अंमलात आणावी.

(ब) शेतीस जरूर असलेल्या सहकारी पतपेढ्या काढण्यात याव्यात.

(क) दुष्काळ, अतिवृष्टीस तोंड देण्यासाठी व त्याचप्रमाणे सावकाराचे मगर- मिठीतून सुटण्यासाठी “ सहकारी गल्ले “ स्थापन करावेत अशी या सभेची बहिष्कृत वर्गास आग्रहाची विनंती आहे

गट g

ठराव १ ला. -- स्वामी श्रद्धानंदजींच्या अमानुष खुनाबद्दल या सभेस अत्यंत दुःख होत आहे, व त्यांनी आखून दिल्याप्रमाणे हिंदू जातीने अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करावे.