¥C डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आंबेडकर चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरुन खाली गेले. ते खाली वाकले आणि त्यांनी तळ्यातील एक ओंजळभर पाणी प्राशन केले. त्या प्रचंड जनसमुदायाने आपल्या नेत्याचे अनुकरण केले ! त्यांनी आपला नागरिक, त्याचप्रमाणे मानवी हकक बजावला. लागलीच परिषदेच्या ठिकाणी मोर्चा शांतपणे परतला नि विसर्जन पावला. नेत्याने योग्य वेळी कृतिपूर्ण पाऊल टाकले पाहिजे. जे काम शेकडो ठरावांनी होत नाही ते अशा एका कृतीने सफल होते. कार्लाईलने म्हटलेच आहे की, ' कृती हे मानवाचे खरे उद्दिष्ट होय.'
अशा प्रकारे प्रचंड कार्य करुन परिषद समाप्त झाली. जो तो घरी परतण्याच्या तयारीला लागला. भारताच्या तीन सहस्त्र वर्षांच्या इतिहासातील परममंगल असा तो भाग्याचा दिवस, माणुसकीचा अन् समानतेचा संदेश भारतास देणारा तो सोन्याचा दिन २० मार्च १९२७ हा होय! डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील परम भाग्याचा तो दिवस. त्या दिवसापासून डॉ. आंबेडकरांच्या कीर्तीच्या लाटा एकामागून एक सर्व देशभर पसरत गेल्या. '' १
'' महाड येथील वरिष्ठ वर्गाच्या लोकांचा अत्याचार
परिषद संपल्यानंतर अध्यक्ष व इतर मुंबईची पाहुणे मंडळी जेथे उतरली होती तेथे म्हणजे सरकारी बंगल्यावर गेली व बाकीचे लोक आपापल्या गावी जाण्याकरिता निघण्यापूर्वी भोजनगृहाकडे गेले. सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास विरेशवराच्या देवळातील गुरव अस्पृश्यलोक विरेश््वराच्या देवळात शिरणार आहेत. तरी तुम्ही धावून देवळाचे संरक्षण करण्यास चला, अशी खोटी दवंडी गावात देत सुटला. अस्पृश्य वर्गांनी तळे बाटविले याचा वचपा . काढण्यासाठी सिद्ध असलेल्या वरिष्ठ वर्गाच्या लोकास हे आयतेच निमित्त मिळाले. दवंडी ऐकल्याबरोबर ४/५ शे लोक विरेश्वराच्या देवळात काठ्या सोटे घेऊन जमा झाले व देवळात अस्पृश्यलोक शिरणार आहेत असा गोंगाट करु लागले. हे पाहून शहर फौजदार डाक बंगल्यावर आले व डॉ. आंबेडकरांना विचारु लागले की, “ आपले लोक देवळात शिरणार आहेत यास्तव शहरातील लोकांनी देवळाजवळ गर्दी केली आहे तर मी त्यांना काय सांगू ?' यावर डॉ. आंबेडकरांनी त्यास सांगितले की, “ आम्हाला देवळात शिरण्याची इच्छा नाही व जरूरीही नाही तरी तुम्ही लोकांची या बाबतीत खातरजमा करुन त्यास शांत करावे.” फौजदार निघून गेल्यानंतर आपल्या लोकांना ताकीद देण्यासाठी आपल्यातील काही लोकास भोजनगृहाकडे पाठवले त्याप्रमाणे परिषदेस आलेले अस्पृश्यलोक आपापले जेवण आटोपून आपापल्या गावी जाण्यास सिद्ध झाले. बरेच अस्पृश्यलोक आपापल्या गावी गेल्यानंतर देवळाजवळ जमलेल्या गांवगुंडांनी पेठेतून घरोघरी जात असलेल्या अस्पृश्य लोकांवर हल्ला केला व
१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर : धनंजय कीर, पृष्ठ ७५-७६.