५-७-१९२७ आम्हाला निधड्या छातीची व स्वाभिमानी माणसे पाहिजेत - Page 96

go

आम्हाला निधड्या छातीची व स्वाभिमानी [माणसे ]
पाहिजेत

रविवार ता. ५ जुलै* १९२७ रोजी मुंबई शहरातील सर्व बहिष्कृत वर्गाची जाहीरसभा महाड येथे अत्याचाराचा निषेध व त्यासंबंधी पुढे काय करावयाचे हे ठरविण्याकरिता सर कावसजी जहांगीर हॉल येथे भरली होती. सभेचे अध्यक्षस्थान डॉ. भीमराव आंबेडकर एम्‌. ए., पीएच. डी., डी. एससी, बार we लॉ., एम. एल. सी. ह्यांनी सुशोभित केले होते. सभेला बहिष्कृत वर्गातील निरनिराळया जातीतील प्रमुख लोक हजर असून, ब्राह्मण- ब्राह्मणेतर पत्राचे संपादक देवराव नाईक, सो. स. लीगचे एक आस्थेवाईक वर्कर गं. नी. सहस्त्रबुद्धे व मद्रासकडील गीतानंद ब्रह्मचारी अशी मंडळी हजर होती. सभेत खाली लिहिल्याप्रमाणे ठराव पास झाले. 5

ठराव १.-अस्पृश्य वर्गाच्या तक्रारी व त्यांच्यावर होत असलेला अन्याय यांचे सरकारकडून योग्यप्रकारे निवारण व्हावे, तसेच सरकारने अस्पृश्योन्नतीप्रित्यर्थ वेळोवेळी केलेले ठराव व पुढे होणारे ठराव यांची कसून अम्मलबजावणी व्हावी याकरिता सरकारने मद्रास इलाख्याप्रमाणे मुंबई इलाख्यातही एक स्वतंत्र अधिकारी नेमावा अशी या सभेची मागणी आहे.

ठराव २.-बहिष्कृत हितकारिणी सभेने महाड येथे सत्याग्रह करण्याची योजना केली आहे. तिला या सभेचा पूर्ण पाठिंबा आहे. या सत्याग्रहात भाग घ्यावा अशी ही सभा बहिष्कृत वर्गातील सर्व जातींच्या लोकांना विनंती करीत आहे.

वरील ठरावांवर मेसर्स वनमाळी, मोहिते, मारवाडी मास्तर, खोलवडीकर, गोविंदजी माधवदास, गंगावणे, गायकवाड, जाधव वगैरे गृहस्थांची भाषणे झाल्यावर अध्यक्षांनी श्रीयुत नाईक व गीतानंद ब्रह्मचारी यांना भाषणे करण्याची विनंती केली. त्या दोघांनीही आपल्या भाषणात सांगितले की, तुम्ही आपले मानवी हक्क प्राप्त करून घेण्याकरिता शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत. वरिष्ठ वर्गांचे लोक हे तोंडपाटिलकी, करणारे आहेत. त्यांना जर तुमच्याबद्दल खरी कळकळ वाटती तर ह्या सभेचे आमंत्रण सर्व वर्तमानपत्रातून जाहीर झाले असता वरिष्ठ वर्गापिकी कोणीच सभेला येऊ नये ही मोठी खेदकारक गोष्ट आहे. अशा सभातून हिंदू महासभेच्या चालकांनी अवश्य भाग घ्यावयास पाहिजे. परंतु ते जर तुमच्यात भाग घेत नाहीत तरी तुम्ही स्वस्थ बसू नका. तुम्हाला जर कोणी अस्पृश्य म्हणाला तर त्यालाही तुम्ही ज्याप्रमाणे बदकाला पाण्यात बुडवून वरखाली

बहिष्कृत भारत : १५ जुलै १९२७.

“तारीख ३ जुले १९२७ असावी- संपादक.