५-७-१९२७ आम्हाला निधड्या छातीची व स्वाभिमानी माणसे पाहिजेत - Page 97

आम्हाला निधड्या छातीची व स्वाभिमानी माणसे पाहिजेत uy

करतात त्याप्रमाणे तुम्हीही जो कोणी अस्पृश्य म्हणेल त्यास त्याच्या दंडाला धरून पाण्यात वरखाली करून बुचकळा. ते येथेपर्यंत करा की, तो मनुष्य पुन्हा तुम्हाला अस्पृश्य म्हणणार नाही. नंतर सभेचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांचे भाषण झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले, |

आपण आता दोन्ही ठराव टाळ्यांच्या गजरात पास केले आहेत. परंतु

त्यापैकी दुसऱ्या ठरावासंबंधाने आपणाला पुरेशी माहिती झालेली दिसत नाही. दुसरा ठराव सत्याग्रह करण्यासंबंधाचा आहे. सत्याग्रह म्हणजे लढाई. पण ही लढाई तलवार, बंदुक, तोफा, बांबगोळे या साधनांनी करावयाची नाही. तर ही लढाई शस्त्रविरहित करावयाची आहे. ज्याप्रमाणे पतुल्लाखली, वैकोम वगैरे ठिकाणी लोकांनी सत्याग्रह केला, त्याचप्रमाणे आपणालाही महाडला सत्याग्रह करावयाचा आहे. हा सत्याग्रह करताना कदाचित सरकार शांतता भंग होऊ नये म्हणून आपणाला कोणत्यातरी कलमाखाली पकडून तुरुंगात घालील. तर तुरुंगात जाण्याकरिता तुमची तयारी पाहिजे. ज्यांना आपल्या बायकामुलांची काळजी वाहावयाची असेल अशा लोकांनी ह्या सत्याग्रहात मुळीच भाग घेऊ नये हे मी आपणास निक्षून सांगतो. आम्हाला सत्याग्रहात जी माणसे पाहिजेत ती निधड्या छातीची व स्वाभिमानी अशी पाहिजेत. अस्पृश्यता हा आपल्या देशावरील कलंक आहे, तो मी घालवीनच घालवीन असा ज्यांचा पक्का निर्धार झाला असेल अशाच लोकांनी आपली नावे सत्याग्रहात नोंदवावी व अशा निर्धाराची माणसे बहिष्कूत समाजातून निघतील अशी आपणास आशा आहे. अशा अर्थाचे भाषण केल्यावर श्री. सीताराम नामदेव शिवतरकर यांनी सर्वांचे आभार मानले. आभार मानताना ते म्हणाले की, आज ह्या सभेला बहिष्कृत वर्गातील सर्व जातीचे लोक, तसेच गीतानंद ब्रह्मचारी, रा. नाईक व सहस्त्रबुद्धे हे आल्याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहो. महाड प्रकरणाबद्दलची ही शेवटची सभा आहे. यापुढे महाड प्रकरणाबद्दल सभा भरविली जाणार नाही. परंतु आजच्या सभेत पास झालेल्या ठरावाप्रमाणे सत्याग्रहाची तयारी करावयाची आहे. हा सत्याग्रह पावसाळा संपल्यावर आम्ही करणार आहो. तरी अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना आपले नाव सत्याग्रहात नोंदवावयाचे असेल त्यांनी दामोदर हॉल, परळ, येथे बहिष्कृत हितकारिणी सभेच्या ऑफीसमध्ये

नोंदवावे.