११
महार जातीवरील आप्पलपोटेपणाचा आरोप
निराधार
बुधवार ता. २० जुलै १९२७ रोजी सायंकाळी साडे सात वाजता पुणे येथील मांगवाड्यात पुण्याच्या “ दीनबंधू “ पत्राचे संपादक डॉ. नवले यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य लोकांची जाहीर सभा भरली होती. त्यावेळी अस्पृश्य आणि स्पृश्य वर्गांतील सुमारे ३०० मंडळी हजर होती. मुंबई कायदेमंडळातील सरकार नियुक्त सभासद डॉ. आंबेडकर, बार-अँट लॉ व डॉ. साळुंखे, सुभेदार घाडगे, मि. राजभोज, मि. के. एम. जाधव, बी. ए., मि. पाताडे, मि. गायकवाड, मि. साळवेकर, मि. इंगळे, मि. लांडगे, मि. सावळेकर, मि. के. के. सकट, मि. घाडगे, मि. वायदंडे, वऱ्हाडातील आनंदस्वामी व मि. पंढरीनाथ पाटील, श्री. धुंडीराज पंत ठेंगडी, आर्यसेवक रा. ओघळे, रा. शंकरराव पोतनीस, रा. देशपांडे वगैरे मंडळी सभेत प्रामुख्याने दिसत होती. सभा असताना पावसाच्या लहान लहान सरी मधून मधून येत होत्या. परंतु डॉ. आंबेडकरांसारख्या अनुभवी gerad भाषण ऐकण्यास मंडळी उत्सुक असल्याकारणाने पावसास न जुमानता सभेचे काम चालूच होते.
रा. के. एम. जाधव यांच्या सूचनेनुरूप डॉ. नवले यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भाषणात म्हणाले,
मी आज मन मोकळे करून बोलणार आहे. माझ्या भाषणाचा कोणीही विपर्यास करू नये. मि. सकट आणि मि. वायदंडे यांनी सध्या माझ्यावर विनाकारण टीका सुरू केली आहे. पुढाऱ्यांवर नेहमी टीका व्हायचीच हे मी जाणून आहे. मी महार जातीचा आहे. हे आपणास माहीतच आहे. महार- जात स्वार्थी आहे हे टीकाकारांचे म्हणणे आहे. परंतु अस्पृश्य वर्गाच्या महारेतर जातीतील पुढाऱ्यांनी महारांकरीता नि:स्वार्थीबुद्धीने काम केले आहे काय? असा माझा त्यांना उलट स्पष्ट सवाल आहे.
वास्तविक पाहता, महारेतर जातीच शैक्षणिक आणि सांपत्तिकदृष्ट्या श्रेष्ठ आहेत. मुंबईत तर चांभार व ढोर जातीतील काही गृहस्थ इनूकमटॅक्स देण्याइतके सधन आहेत. असे असताना त्यांनी महार लोकांच्या उन्नतीप्रित्यर्थ काही प्रयत्न केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. उलटपक्षी आम्ही अनेक उपयुक्त संस्था काढून नुसत्या महार जातीच्याच नव्हे तर अस्पृश्यातील सर्व जातींच्या उन्नतीकरिता काया-वाचा-मने झटत आहोत. बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करून अस्पृश्यो्रतीचे काम आम्ही हाती घेतले आहे. सोलापूरात आम्ही
बहिष्कृत भारत : २९ जुलै १९२७.