३१-१२-१९३७ अस्पृश्य समाजात एकी नाही ह्याचे कारण जातिभेद हेच आहे - Page 100

६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हा कटू प्रसंग येथे मुद्दाम नमूद करण्याचे कारण आपल्या लोकांनीही ध्यानात ठेवले पाहिजे की अस्पृश्यांची चळवळ साधारणतः बहुजन समाजाच्या डोळ्यात नेहमी सलत असते व आपल्याला कोणाकडून लहानसहान प्रमाणात देखील साहाय्य मिळेल अशी अपेक्षा न करता त्यांनी वागले पाहिजे, नाही तर अपमानकारक प्रसंग आल्याशिवाय राहणार नाहीत.

कुर्डुवाडीस डॉ. साहेबांकरिता एका स्पेशल मोटारीची व्यवस्था करण्यात आली | होती व इतर पाहुणे व स्वयंसेवकांकरिता एक स्पेशल बस ठेवण्यात आली होती. या दोन गाड्या दिवस उजाडण्याच्या सुमारास पंढरपूरच्या मार्गास लागल्या. वाटेत माढे तालुक्यातील वावळे गावी गावातर्फे डॉ. बाबासाहेबांस व | इतर आमदारांस हार अर्पण करण्यात आले. पुढे कर्कम गावाजवळ गाडी येताच गावातील अस्पृश्य समाज व स्वयंसेवक दल डॉ. साहेबांच्या स्वागतार्थ वाजंत्र्यांसह सामोरे आले व जमलेल्या मंडळीचे मिरवणुकीत रूपांतर झाले. गावात | महार समाज व मातंग समाज यांनी मंडप उभारून बाबासाहेबांच्या स्वागताची तयारी केली होती. कर्कम गावातून मिरवणूक निघाल्यानंतर डॉ. साहेबांची | मोटार व दुसरी स्वयंसेवकांची बस कर्कम गावाजवळील बादलकोट फॉरेस्ट मधील | चंद्रभागेच्या काठावरील पडित जमिनी पहावयास निघाली. मोटारमध्ये आमदार | गायकवाड, ऐदाळे, रोहम, सावंत व श्री. चित्रे इतकी मंडळी होती. ही पडित | जमीन अस्पृश्य समाजातील लोकांना सवलतीने मिळावी म्हणून आमदार ऐदाळे यांनी सरकारजवळ प्रयत्न चालविला आहे. ती जमीन बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष अवलोकनात यावी म्हणून श्री. ऐदाळे यांनी हा कार्यक्रम आखला होता. पडित जागेजवळ पोचण्याकरिता ३ मैलांचा पायी प्रवास करून ती बाबासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिली व नदीच्या काठावर गावकऱ्यांनी आणलेला अल्पाहार ग्रहण करून | डॉक्टरसाहेब परत ककम गावी आले. त्याठिकाणी गावातील महार समाजाने | खास उभारलेल्या मंडपात त्यांचे प्रेमाने स्वागत केले व त्यांना दोन शब्द बोलण्यास विनंती केली. आपल्याला जे काही बोलावयाचे ते मातंग समाजाने स्वागताचा / कार्यक्रम आखला आहे त्या ठिकाणी आपण बोलू असे सांगून बाबासाहेबांनी | आमदार गायकवाड यास दोन शब्द बोलण्यास आज्ञा केली. नंतर भाऊराव गायकवाड यांनी थोडक्यात समयोचित भाषण केल्यावर डॉक्टरसाहेबांनी सर्वानी | स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हावे असे सांगून तो कार्यक्रम आटोपला. नंतर मंडळी मातंग समाजाने उभारलेल्या मंडपात दाखल झाली. येथे महार व मातंग समाजाचा मोठा लोकसमुदाय जमलेला होता. |