३१-१२-१९३७ अस्पृश्य समाजात एकी नाही ह्याचे कारण जातिभेद हेच आहे - Page 101

अस्पृश्य समाजात . . . . . जातीभेद हेच आहे ६३

त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेबांनी लहानसे भाषण करताना सांगितले.

उद्या म्हणजे ता. १ जानेवारी १९३८ रोजी सोलापूर मुक्कामी मातंग समाजाची

एक परिषद भरणार आहे. त्यावेळी मला आमंत्रणाने बोलावण्यात आले

असल्यामुळे मी त्या प्रसंगी सविस्तर रीतीने बोलणार असल्याकारणाने मी या वेळेस

दोनच शब्द बोलणार आहे आणि ते बोलण्याचा उद्देश हा की आपल्यापैकी काही

इसम परिषदेस हजर राहाणार असले तरी काही मंडळी तेथे न जाणारीही असणार

तेव्हा या लोकांना माझे म्हणणे ऐकावयास मिळावे. प्रथमतः अस्पृश्य समाजात

मोडणाऱ्या महार, चांभार, भंगी वगैरे ज्या जाती आहेत त्यात एकी नाही हे आपणा

सर्वाचे दुर्दैव होय. ही एकी नसण्याचे खरे कारण म्हणजे हिंदू समाजातील

जातीभेद हेच आहे. ह्या जातीभेदाला महार, मांग, चांभार किंवा भंगी हे

जबाबदार नाहीत. जातीभेद ही वरून वहात आलेली गटारगंगा आहे. हा ' आपलेकडे वहात येणारा नरक आहे आणि त्यामुळे जातीभेदाची कटू फळे व

त्याचा दुष्परिणाम आपल्याला सोसावा लागत आहे आणि खेदाची गोष्ट ही की

हे हिंदू. लोक आपल्यातील जातीभेद तर दूर करीत नाहीतच उलट अस्पृश्यांतील

अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचा जातीभेद दृढ करावयास झटतात. मातंगांना

हाती धरून महारांविरूद्ध उठवावयाचे, चांमारांना हाती धरून त्यांना

महार-मांगांच्या विरूद्ध उठवावयाचे व आपली भेदनीती आमच्यात पसरवायची

व आपली एकी होऊ द्यावयाची नाही. मात्र या जातीभेदाची मूळ जबाबदारी जरी

हिंदू समाजावर असली तरी आपण आपली जबाबदारी विसरणे आत्मघातकी

ठरेल. आपल्यातील जातीभेद नाहीसे करणे व आपल्यात भेदनीतीचा फैलाव म होऊ देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि आपण हे साधल्याशिवाय आपला भाग्योदय कधीच होणार नाही. महार-मांगातील रोटी बंदी, बेटी बंदी अजिबात नष्ट झाली पाहिजे. प्रत्येक जात जर आपली शेखी मिरवण्याकरिता आपल्या जातीसच चिकटून राहील आणि महार महारच राहील व मांग मांगच राहील तर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार आपण करू शकणार नाही. महार किंवा मांग या नावात असे काय आहे की त्यात तुम्हाला अभिमान वाटावा? या नावाने असा कोणता उज्ज्वल इतिहास तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहतो की जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे ? सर्व समाज या नावांना तुच्छ लेखीत आहे. तुम्हाला आज उकिरड्यावरील कचऱ्याची देखील किंमत नाही ; तेव्हा श्रा नावाचा अभिमान न बाळगता आपले दोन्ही समाज एका वरवंट्याखाली चिरडले ज्ञात आहेत हे जाणले पाहिजे व दोघांनी एकजुटीने राहिले पाहिजे. या बाबतीत महार समाजापुरते जर सांगावयाचे असेल तर ते कोणताच जातीभेद मानावयास तयार नाहीत. मांग, चांभार किंवा भंगी यांच्याशी रोटी व्यवहार किंवा बेटी व्यवहार करावयास त्यांची तयारी आहे आणि जर महार लोक या गोष्टी करण्यास कचरत असतील तर त्यांना त्या करण्यास भाग पाडण्याची मी हमी घेतो.