३१-१२-१९३७ अस्पृश्य समाजात एकी नाही ह्याचे कारण जातिभेद हेच आहे - Page 99

११२
अस्पृश्य समाजात एकी नाही
ह्याचे कारण जातीभेद हेच आहे

गुरूवार ता. ३० डिसेंबर १९३७ रोजी रात्रौ मद्रास मेलने

१० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोरीबंदर स्टेशनवरून सोलापूर जिल्ह्यातील दौन्याकरिता निघाले. त्यांचेबरोबर नाशिकचे आमदार भाऊराव गायकवाड व श्री. कमलाकांत चित्रे हे होते. वाटेत दादर स्टेशनवर परिषदेस हजर राहाण्याकरिता नाशिकहून आलेली रामा पाला (भंगी समाजाचे एक पुढारी) वगैरे मंडळी येऊन मिळाली. दादर स्टेशनवर डाँक्टरसाहेबांस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर पुण्याच्या स्टेशनवर साताऱ्याचे आमदार श्री. खंडेराव सावंत गाडीत चढले व दौंड स्टेशनवर [आमदार ] [श्री. ] [प्रभाकर ] [रोहम ] व नगरची इतर मंडळी दौऱ्यात सामील [झाली. ]

॥ सोलापूर जिल्हा परिषद पंढरपूर मुक्कामी भरावयाची होती. त्याकरिता डॉ. बाबासाहेब व त्यांच्या बरोबरीची इतर मंडळी कुर्डुवाडी स्टेशनवर शुक्रवार तारीख ३१-१२-१९३७ रोजी पहाटेस साडेपाच चे सुमारास दाखल झाली. स्टेशनवर परिषदेचे स्वागताध्यक्ष आमदार श्री. जीवाप्पा ऐदाळे डॉ. बाबासाहेबांचे स्वागत करण्याकरिता सामोरे आले होते. त्यांनी | व इतर जमलेल्या. मंडळीनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले व डॉ. बाबासाहेबांस

पुष्पहार अर्पण केले.

कुर्डुवाडी स्टेशनचा प्लॅटफार्म माणसांनी अगदी भरून गेला होता. या स्टेशनवरील रेल्वे अधिकाऱ्यांचे वर्तन मात्र संतापजनक होते व त्यांना गरीब जनतेचा उत्साह व डॉ. बाबासाहेबांच्या लोकप्रियतेचा उत्कर्ष मुळीच सहन होत नव्हता असे कष्टाने म्हणावे लागते. उत्साहाच्या भरात डॉक्टरसाहेबांच्या दर्शनास उत्सुक झालेले काही थोडे लोक बिगर तिकीट प्जॅटफार्मवर गेले होते. त्या सर्वाजवळून त्यांनी दौंड स्टेशनपासूनच्या तिकिटाच्या डबल पैशाची मागणी केली. येथे जमलेले निर्धन लोक एवढे द्रव्य आणणार कोठून ? परंतु शेवटी स्टेशनमास्तरांच्या मध्यस्तीने हा प्रसंग कसाबसा टळला व अडकून राहिलेल्या मंडळीची सुटका झाली.

जनता : ८ जानेवारी, १९३८.