११३
जुलूम करणान्यांसोबत दोन हात करण्याची
तयारी ठेवा
दिनांक ३१ डिसेंबर १९३७ रोजी कर्कमहून पंढरपूरचा मार्ग आक्रमण करीत
असता मोटार गाडीत आमदार मंडळी निरनिराळे विषय काढून आपल्या अलौकिक
पुढाऱ्याच्या मुखातून वाहणाऱ्या अमृतधारांचे मनसोक्त पान करीत होती. थोडक्याच
वेळात म्हणजे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेच्या ऐलथडीवर गाडी
थडकली. या ठिकाणी स्त्री-पुरुषांचा अलोट समुदाय, मृत समाजात संजीवनी
उत्पन्न करणाऱ्या लोकोत्तर विभूतीचे दर्शन घेण्याकरिता जमला होता. मोटार
दृष्टीपथात येताच जयजयकारांचे ध्वनी घुमू लागले व लोकांचे थवेच्या थवे
द्वर्शनोत्सुक होत्साते मोटारीपुढे धावत येऊ लागले व चंद्रभागेवरील पुलाचे
सोंडाजवळ ज्या वेळेस गाडी आली त्या वेळेस भोटारीस पुढे जाण्यास वाव मिळेना.
- संपादक महाराज, तुमचा बातमीदार काही पंढरपूरचा वारकरी नाही. साऱ्या
हयातीत पंढरपुरास, त्याची ही पहिलीच भेट होय. पण " पंढरपूरचा महिमा “
मात्र त्याने कानानी ऐकला आहे. विठोबाचे दर्शन घेण्यास अगणित जनसंमर्द
पंढरीत प्रवेश करतो असे त्याने ऐकले होते. पण एका विभूतीचे दर्शन घेण्यास
पंढरपूरवासी जनता चंद्रभागा ओलांडून व "' विठ्ठलास “ विन्मुख होऊन पंढरीच्या
बाहेर पडते असे त्याने ऐकले नव्हते ; पण तुमच्या वार्ताहारास आज काय दृष्टीस
पडत होते ? एक समाज विट्टल दर्शन घेण्यास पंढरीस प्रवेश करतो तर दुसरा समाज विठ्ठलाच्या महतीवर आघात करणाऱ्या विभूतीचे दर्शन घेण्याकरता श्रंढरीच्या बाहेर पडतो. ह्या दृश्यामुळेच वेड्या धार्मिक भावनेने अंध झालेला
बहुजन समाज आपल्या दृष्टीवरील कृष्णपटल दूर करून हिंदमातेचा भविष्यकाल
#ज्ज्वल करील अशा आशेचे किरण क्षणभर तुमच्या बातमीदाराच्या मनात
भ्रमकले. ते काही असो. या दृश्यावरून एवढे स्पष्ट दिसत होते की, स्पृश्य
क्ममाज जो मार्ग आक्रमित आहे त्याच्या अगदी उलट दिशेस अस्पृश्य गणल्या
शैलेल्या समाजाचा आजचा मार्ग आहे.
मोटारीचा पुढला मार्ग गणवेष धारण केलेल्या समता सैनिक दलाच्या स्थानिक बैथकांनी खुला करून दिला व गाडी पुलावरून जाऊ लागली. गाडीच्या दुतर्फा लोकांची गर्दी, पुढे स्वयंसेवक, मागे अलोट घोळका अशी मिरवणूक दिसू ब्लागली. मोटारची अगदी मंदगती झाली व पुढील कार्यक्रम आखल्याप्रमाणे पार ्रडणे- मुश्कीलीचे झाले. मोटार जलद चालली तर लोक समुदायही धावू
जनता: ८ आणि १५ जानेवारी १९३८.