जुलूम करणाऱ्यांसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवा ६९
करणाऱ्याशी दोन हात करावयास न डगमगता तयार झाले पाहिजे. काय व्हायचे असेल ते होईल, त्याला भिण्याचे कारण काय आहे ? तुमच्याजवळ आहे काय की ते हरपण्याची धास्ती वाटावी ? तुम्ही मरणास देखील भिता कामा नये. इतके तुम्ही निर्भय झालात तरच तुमच्यावरील जुलूमांचा तुम्हास प्रतिकार करता येईल. आपल्यातील तरूण माणसांनी आपल्या पेहेरावात देखील सुधारणा करावयासं हवी. धोतराच्या ऐवजी आखूड तुमान व अंगात एक कुडते म्हणजे स्काउटचा ड्रेस केला पाहिजे. १८ वर्षापासून ४० वर्षापर्यंत प्रत्येकाने असा सुटसुटीत पोशाख केल्यास तुमच्या मनोवृत्तीत देखील बदल झाल्याशिवाय राहाणार नाही व तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल. शिवाय अंतःशुद्धीस जोड म्हणून जुलूमापासून रक्षण करण्याकरिता आपल्याला एक फंड उभारला पाहिजे. त्या निधीतून कायदेशीर इलाज व पीडितांचे दुःख निवारण ह्या गोष्टी कराव्या लागतील |
मी सांगितलेल्या सर्व गोष्टी करण्यास तुम्ही आता सिद्ध झाले पाहिजे आणि तसे तुम्ही व्हाल अशी माझी खात्री आहे
याप्रमाणे बाबासाहेबांचे १ तास पर्यंत अस्खलित भाषण झाल्यावर सभेपुढे तीन ठराव मांडण्यात आले. ते असे (१) महारकी वतन बिलास पाठिंबा (२) खोती पद्धत नष्ट करणाऱ्या बिलास पाठिंबा व (३) जनतेचे वर्गणीदार व स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होण्यास विनंती. शेवटी आभार प्रदर्शन झाल्यावर सभा विसर्जन करण्यात आली व बाबासाहेब व त्यांचे बरोबर असलेली मंडळी पंढरपूर म्युनिसिपालिटीचे हॉलमध्ये गेली. याठिकाणी म्युनिसिपालिटीचे सभासद जमले होते. म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष रा. ब. परिचारक यांनी समयोचित भाषण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत केले व त्यांना पुष्पहार अर्पण केला. नंतर इतर सभासदांची व बाबासाहेबांची ओळख करून देण्यात आली. डॉक्टरसाहेबांनी उत्तरादाखल भाषण केले व पंढरपूर म्युनिसिपालिटीचे
आभार मानले. |
नंतर मंडळी स्थानिक वकील श्री. पटवर्धन यांचे येथे निमंत्रणावरून चहापानाकरिता गेली व त्या दिवसाचा कार्यक्रम आटोपला.
७ ० ७