१-१-३८ राजकारणाचा गाडा ओढताना चाक अंगावर येणार नाही ह्याची खबरदारी घ्या - Page 108

११४
राजकारणाचा गाडा ओढताना
चाक अंगावर येणार नाही ह्याची खबरदारी घ्या

नव्या वर्षाच्या दिवशी म्हणजे १ जानेवारी १९३८ रोजी रा. बळवंतराव

गायकवाड, रा. रामभाऊ पाटोळे व र. बी. शिंदे यांनी रे. गंगाधरराव जाधव यांच्या

अध्यक्षतेखाली रा. ऐदाळे, एम. एल. ए. यांच्या साहाय्याने डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांचे एक फार मननीय व्याख्यान सोलापूर येथील खिस्ती समाजास

लाभू देण्याची व्यवस्था केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम आपल्या चरित्रास शून्यापासून नव्हे परंतु उणे चिन्हापासून सुरवात होऊन हल्ली आहे त्या स्थितीप्रद कसे ते येऊन ठेपले आहेत ते दाखविले. यात त्यांचा हेतू इतकाच की, आपला समाज दुबळा म्हणून रे, रे, करीत काळ घालवू नये तर नवीन वर्षाच्या नवीन निश्चयाने त्याची प्रगती करण्यास झटावे. डॉ. बाबासाहेब पुढे म्हणाले,

आपल्या धर्मांतराची विटंबना चहूकडे चालली आहे, याचा मासला प्रि. अत्र्यांच्या वंदे मातरम्‌ या नाटकातील एका प्रसंगावरून दर्शविता येईल. तथापि धर्मांतराच्या ध्येयापासून रेसमात्रही ढळण्यास तयार नाही. बाकी धर्मातर करणाऱ्याचे कोणी गोडवे गाईलेले आहेत असे निदान आपल्या हिंदुस्थानात तरी दृष्टोत्पत्तीस आलेले नाही.

जगात उपलब्ध असलेल्या प्रमुख धर्मांचे चांगले अध्ययन आध्यात्मिक दृष्टीने मी केले आहे व त्या सर्व धर्मात केवळ दोनच धर्म व त्यातील दोनच व्यक्ती माझ्या धर्मांतराचे दृष्टीसमोर आहेत. त्यापैकी पहिली व्यक्ती बुद्ध व दुसरा ख्रिस्त. 'मनुष्याचे मनुष्याशी कर्तव्य काय आहे व मनुष्याचे देवाशी कर्तव्य काय आहे, मुलाने बापाशी कसे वागावे, सर्व माणसास समता, स्वतंत्रता ज्या धर्मात अनुभवावयास सापडेल असाच धर्म मला व माझ्या अनुयायांस हवा आहे.”

मिशनरींना वाटते की आपण मनुष्याला खिस्ती केले की आपले काम झाले पण त्याच्या राजकीय हक्कांची काही सोय ते पाहात नाहीत मला खिस्ती लोकात हा एक फार मोठा दोष दिसतो. कारण त्यांनी आजपर्यंत राजकारणात घालावा . तसा हात घातला नाही कोणत्याही संस्थेला राजकीय आधार असल्याशिवाय ती

जनता : ५ फेब्रुवारी १९३८.