राजकारणाचा गाडा ओढताना . . . . ह्याची खबरदारी घ्या ७१
टिकणे फार कठीण आहे. आम्ही अस्पृश्य, अडाणी व अशिक्षित जरी आहोत तरी आम्ही चळवळ करीत आहोत, व त्यामुळेच आमच्या १५ जागा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत आहेत. अस्पृश्य मुलांना सरकारी स्कॉलरशिपा मिळू लागल्या आहेत व आमच्या मुलामुलींकरिता सरकारने बोर्डिंग काढलेल्या आहेत. पण खिस्ती लोकांच्या बाबतीत तसे काही नाही; एखादा अस्पृश्य मुलगा, तो अस्पृश्य आहे तोपर्यंत त्याला सरकारी स्कॉलरशिप मिळते पण तोच उद्या खिस्ती झाल्यास ती बंद होते, म्हणजे धर्मातर केल्याबरोबर त्याचे दारिद्र्य जात नाही. पण धर्मातरामुळे त्याला ही आर्थिक हानी मात्र सोसावी लागते. तेच तुमचा राजकारणात हात असता तर ह्याच्या उलट परिस्थिती झाली असती.
तुमचा समाज शिकलेला आहे. शेकडो मुलगे व मुली मॅट्रिक झालेले आहेत, त्यांनी ह्या सार्वजनिक अन्यायाविरूद्ध अशिक्षित अस्पृश्यांसारखी कधीही चळवळ केलेली नाही. एखादी मुलगी नर्स झाली की ती आपल्याच धंद्यात डोके घालते व आपल्यापुरतेच पहाते. कोणी मास्तर झाला की तो आपल्या मास्तरकीत दंग होतो व सार्वजनिक कामात पडत नाही. कोणी कारकून किंवा कोणत्याही हुद्यावर असला तरी तो आपल्याच व्यापात असतो व सामाजिक अन्यायाकडे दुर्लक्ष करितो. तुमचा समाज इतका जरी सुशिक्षित आहे तरी तुमच्यातील कितीसे डिस्ट्रिक्ट जज्ज किंवा मॅजिस्ट्रेट आहेत? ह्याचे कारण तुमचे राजकारणाकडे
असलेले दुर्लक्ष हे मी सांगतो कारण-तुमच्या हितासाठी बोलायला व भांडायला
सरकारात कोणीच नाही. राजकारणाचा गाडा ओढायला तुमच्यातील कोणी
असल्यास जरी आपल्या इच्छेप्रमाणे तो चालत नसला तरी निदान त्याचे चाक
आपल्या अंगावर न येऊ देण्याची तरी तुम्हास खबरदारी घेता येईल.
तुग्ही मुक्कामावर आहात व आम्ही मार्ग चालत आहोत, तुमच्या मुक्कामाच्या
बऱ्यावाईटपणावरच आमचा त्या ठिकाणी मुक्काम येणार.