१०-१-३८ साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मेत्री जमेल का ? - Page 113

साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मैत्री जमेल का ? ७५

खरे पाहिले असता जगात फक्त दोनच जाती आहेत. पहिली श्रीमंतांची व

दुसरी गरिबांची. याशिवाय तिसरा वर्ग म्हटला म्हणजे मध्यम वर्ग होय. जगातल्या कोणत्याही उज्ज्वल चळवळीच्या नाशास हाच वर्ग कारणीभूत होत असतो. आपण कल्पना करा की आपल्या देशात कष्टाने आपले पोट भरणारे बांधव शेकडा ८० आहेत. या संख्येच्या मानाने इतर वर्ग किती अल्प आहेत याची कल्पना करा. परंतु केवळ अज्ञानामुळे आणि या वरिष्ठ म्हणणारांच्या

हाती सत्ता असल्यामुळे आपणासारख्या बहुसंख्यांक जनतेला ते शह देऊ शकतात. परंतु आपण सर्व लोक जागृत झालात, तुम्हाला तुमचे हित कशात आहे हे संघशक्तीने आणि स्वावलंबनाने कळावयास लागले तर आपण एका चुटकीसरशी सर्व अधिकार आपल्या हाती घेऊ शकाल. आपण राष्ट्रीय

काँग्रेसच्या मागील कायदेभंगाच्या चळवळीचे बारकाईने निरीक्षण केल्यास

आपणास स्पष्ट कळून येईल की कष्ट करणाऱ्या लोकांच्या साहाय्यावरच

काँग्रेसला आपला लढा इतक्या प्रभावाने लढविता आला. या कष्ट करणाऱ्या

लोकांना या काँग्रेसच्या सत्ताधारी लोकांनी त्यावेळी पुष्कळ आशायुक्त वचने दिली

होती. काँग्रेसच्या हाती. राजकीय सत्ता आल्यावर काँग्रेस पहिल्या प्रथम

गोरगरीब श्रमजिवी वर्गाच्या हितरक्षणाचा प्रश्‍न हाती घेईल, असे ती म्हणे. परंतु

आज तुम्हास काय दिसत आहे ? आज काँग्रेसच्या हाती सत्ता आहे पण त्यांनी

अजून कोणत्याही प्रकारची कामगिरी मोठ्या आस्थेने किंवा तातडीने केलेली

नाही. आज त्यांचे प्रतिनिधी मुंबई असेंब्लीमध्ये बहुसंख्यांक असे

आहेत. बहुमताच्या बळावर त्यांना तुमच्या हितसंबंधासाठी वाटेल ते कायदे

करणे अशक्य नाही. आमच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे अंवघे १४-१५ सभासद

आहेत. इतक्या थोड्या सभासदांच्या बळावर आम्हाला तुमच्या हितसंबंधाचे

कायदे पास करून घेणे अशक्य आहे. म्हणून यापुढे लक्षात ठेवा की या

क्रॉग्रेसच्या भांडवलदार लोकांना आपली मते देऊन निवडून देऊ नका. आज

जसे आपण संघटितपणे येथे आला आहात तसेच जातिभेद-धर्मभेद विसरून

आपली संघटना जोरदार करा.

आपण कोकण प्रांतातली स्थिती पाहिली तर खोतादी सावकार लोक अवघे

हजार किंवा दोन हजार असतील आणि तुम्ही काबाडकष्ट करणारे लोक १३

लक्षावर आहात. अशा परिस्थितीत आपण इतके दुबळे का, याचे मला मोठे

आश्चर्य वाटते. आज हजार दोन हजार लोक आपणासारख्या १३ लक्ष लोकांवर

हुकुमत चालंवीत आहेत. याचे मूळ कारण आपली दारुण गरिबी होय. तुम्ही

या मूठभर श्रीमंतांकडून पिळले गेला आहात. तुमच्यामध्ये या पिळलेल्या

अवस्थेत प्रतिकार करण्याची शक्तीच राहिली नाही. यासाठी ज्यांनी तुमची

अशी असह्य अवस्था केली त्या खोतादी श्रीमंतांना यापुढे कोणत्याही प्रकारचे