७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
(५) लहान शेतकऱ्यांची पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी केली पाहिजे. लहानलहान शेतकरी व कुळे याना फायदेशीर होईल असे धोरण खात्याने चालविण्याच्या दृष्टीने इरिगेशन कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे.
(६) सर्व खेड्यांना मोफत चराई राने असावीत.
(७) कर्ज निवारणाचा योग्य तो कायदा सर्वत्र लागू होईपर्यंत कर्ण जाहीर करावी.
(८) शेतकऱ्यांच्या हातून सावकारांच्या हाती जमीन जाऊ नये या सावकारीवर बंधने घालावी.
(९) शेतकऱ्यांच्या निर्वाहासाठी लागणारी किमान जमीन व त्याच्या चरिता लागणाऱ्या वस्तूंवर सावकारी जप्ती आणण्यास बंदी झाली पाहिजे.
(१०) वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषास मताधिकार.
(११) वेठ-बिगार करून घेणे व बेकायदेशीर रीतीने पैसे उकळणे, हे फौजदारी गुन्हे ठरविले पाहिजेत.
(१२) जमीन महसूल खात्यातील सर्व मॅजिस्ट्रेटी अधिकार काढून घ्यावेत.
(१३) कसता येण्याजोगी सर्व पडित जमीन उपरी शेतमजूरांना मोफत वाटून द्यावी.