१८-१-३८ राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेसाठी हिंदू- मुस्लीम विभक्तीकरण विनाशक - Page 117

११६
राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेसाठी हिंदू-मुस्लिम
विभक्तीकरण विनाशक

मुंबई प्रांतिक असेब्लीच्या बैठकीला मंगळवार ता. १८ जानेवारी १९३८ पासून सुरुवात झाली. ना. पाटील यांनी लोकल बोर्ड कायदा दुरूस्ती बिल असेंब्लीपुढे मांडले. या बिलात विशेषतः नॉमिनेशन पद्धत रद्द केली असून त्याऐवजी अस्पृश्य व स्त्री वर्गास संयुक्त मतदारसंघात राखीव जागा ठेवण्यात

आल्या आहेत.

या ठरावाची बाजू मांडताना सांगण्यात आले की, आजपर्यंत सरकारनियुक्त सभासद निवडल्यामुळे, लोकशाहीच्या तत्त्वावर गदा आणली गेली होती. अशी राष्ट्रीय वृत्तीला अडथळा करणारी पद्धतच नष्ट करण्यात सरकारने पुढाकार घेतला आहे. ही अनिष्ट पद्धत नवीन कायदेमंडळातून नाहीशी केली आहे. तसेच तिचे स्थानिक स्वराज्यातून उच्चाटन झाले पाहिजे. सर अल्ली महंमद देहलवी यांनी आपल्या मुसलमान समाजासाठी स्वतंत्र मजूर संघाची का आवश्यकता आहे याचे महत्त्व प्रतिपादन केल्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दणदणीत भाषण झाले. डॉ. साहेबांच्या भाषणाच्यावेळी सभागृहात गांभीर्य प्राप्त झाले होते. तरीपण काँग्रेसचे बेळगावचे प्रतिनिधी श्री. गोखले यांनी मध्यंतरी काहीतरी वेडगळपणा केलाच. त्यांना एक सणसणीत टोला देऊन डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

या दुरूस्ती बिलात थोड्या, अगदी अल्प प्रमाणातल्या प्रगतीशिवाय विशेष राम आहे असे मला वाटत नाही. या बिलातील संयुक्त मतदानपद्धतीविषयी मला बोलायचे नाही. कारण मी पुणे कराराने संयुक्त मतदान पद्धतीला बांधला गेलो आहे. तरीपण या पद्धतीविषयी माझा दृष्टिकोन कोणता आहे हे मी स्पष्टपणे निवेदन करीत आहे. ही संयुक्‍त मतदान पद्धत मान्य केल्यावर विशेष काय घडून आले, इकडे दृष्टी देताना असे दिसून येईल की, फक्त निवडणुकीच्या दिवशी हिंदू व मुसलमान जाती एकत्र मतदानासाठी येऊ शकतील, मते देतील. पण त्यामुळे उभय समाजाच्या मनोवृत्तीत कोणता बदल होईल ? ज्या ` भावनेसाठी, ज्या राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेसाठी ही संयुक्त मतदान पद्धत अमलात

जनता : २२ जानेवारी १९३८.