८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आणली जात आहे त्यादृष्टीने याने कोणता बदल घडून येणार ? निवडणुकीच्या दिवसानंतर या उभय समाजाचे विभक्तीकरण कायमच राहणार ! व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले तर हे दोघे भिन्न धर्माचे समाज बंधु एकाच चाळीत एकत्र कधीही राहू शकणार नाहीत. एकत्र सहभोजन करणार नाहीत. बेटी व्यवहार तर अशक्य कोटीतली गोष्ट. मग नुसत्या संयुक्त मतदारसंघाने या उभय समाजात एकी कशी होणार ? यासाठी आजची सारी सामाजिक बंधने ताडकन तोडून टाकली पाहिजेत आणि यासाठी प्रथम हिंदू समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. याशिवाय असल्या बिलात असल्या राष्ट्रभावना जागृत करण्याच्या योजना योजून मुळीच कार्यभाग होणार नाही. या सर्वसाधारण दुरूस्ती बिलाविषयी स्पष्टपणे बोलायचे म्हणजे माझी निराशा झालेली आहे. या बिलात समाधान होण्यासारखे काय आहे असे शोधू लागल्यास ' दर्यामे खसखस ' अशीच अवस्था व्हायची.