१२-२-१९३८ चातुर्वर्णामुळे हिंदुस्थानचा ऱ्हास व अध:पात झाला - Page 119

११७

यामुळे हिंदु
चातुर्व स्थानचा ऱ्हास व अधःपात झाला

ता. १२ फेब्रुवारी १९३८ शनिवार रोजी सकाळी ९ वाजता मनमाडहून निघून

परिषदेसाठी सटाण्यास जात असता वाटेत चांदवड वगैरे ठिकाणी डॉ. बाबासाहेब

आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. दुपारी ११ वाजता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री. देवराव नाईक, प्रधान, कवळी, गणपतराव निळे,

रोकडे, भोळे, भाऊराव गायकवाड व नाशिक जिल्हा युवकसंघाच्या २०

स्वयंसेवकांची एक मोटार या समवेत सटाण्यास पोचले. सरटाण्याचे

श्री. अभिमान पाटील, धर्मा तानाजी पाटील व प्रमुख मंडळी दोन मैल सामोरे आली

होती. डॉ. बाबासाहेबांची मिरवणूक सटाण्याच्या प्रमुख रस्त्यानी काढण्यात

आली होती. सर्व गावभर डॉ. बाबासाहेबांच्या स्वागतार्थ पताका वगैरे लावण्यात

आल्या होत्या. गावाच्या वरच्या भागात यशवंतराव महाराजांच्या मंदिराच्या मागे

नदीपात्रात मुद्दाम तयार केलेल्या भव्य मंडपात परिषदेची तयारी केली

होती. परिषदेचे स्वागताध्यक्ष महंत नानकदास यांनी डॉ. बाबासाहेबांचे व

| जमलेल्या पाहुणे मंडळींचे स्वागत केल्यानंतर परिषदेचे अध्यक्षस्थान | डॉ. बाबासाहेबांनी स्वीकारावे म्हणून ठराव मांडण्यात आल्यानंतर व त्यास रीतसर

अनुमोदन मिळाल्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. परिषदेत

श्री. भोळे, देवराव नाईक, भाऊराव गायकवाड वगैरेंची भाषणे झाल्यावर

डॉ. बाबासाहेब प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात व जनतेच्या जयघोषात बोलण्यास

उभे राहिले. डॉ. बाबासाहेब म्हणाले,

बंधु आणि भगिनींनो, |

मी रेल्वेकामगारांच्या मनमाडास भरणाऱ्या परिषदेसाठी या भागात आलो

असता आपल्या भागात येण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मला आनंद होत

आहे. माझ्या या दौऱ्यातील मुख्य हेतू आपले राजकारण लढविण्यासाठी निर्माण

केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रचार करणे असा आहे. आजच्या प्रसंगी स्वतंत्र

मजूर पक्षाच्या महतीपेक्षा दुसरे काही सांगण्याचे प्रयोजन मला दिसत नाही. आजच्या सभेत बरेच मानीव स्पृश्य बंधु हजर आहेत हे पाहून मला आनंद होत आहे. मागे आम्ही ज्या सभा भरवीत असू त्याही सभांना मानीव स्पृश्यांची काही मंडळी हजर राहत असत परंतु ती मंडळी आमच्या त्या सभात काय तमाशा चालला आहे हे पाहण्यासाठी जमत असत. आजची स्थिती तशी नसल्याने मीही

जनता : २६ फेब्रुवारी १९३८.