चातुर्वर्ण्यामुळे हिंदुस्थानाचा-ऱ्हास व अधःपात झाला ८३
हिंदुस्थानावर चढाई करून अलेक्झांडर आला अगर महंमद तघलक आला तरी मूठभर क्षत्रियांखेरीज दुसऱ्या कोणीच लढण्यास अगर राष्ट्राच्या संरक्षणास जाऊ नये ही चातुर्वर्ण्याची शिकवणूक. मूठभर ब्राह्मण त्यांना शस्त्र द्यावयाचे नाही. वैश्यांनी' शस्त्र घ्यावयाचे नाही. शुद्रांनी हाती शस्त्र धरावयाचे नाही. या शिकवणुकीनेच हिंदुस्थानचा ऱ्हास व अध:पात झाला आहे. ज्याच्या 'मनगटात जोर आहे अशांना हातात शस्त्र धरण्याची जर मोकळीक, असती तर झाला तसा विपरीत प्रकार झाला नसता. या सर्व क्लुप्त्या धर्मगुरू म्हणून मिरविणाऱ्या भटांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जरी प्रथम केल्या असल्या तरी परिणामी त्या राष्ट्रविघातंक झाल्या आहेत यात वाद नाही. अस्पृश्य मानलेल्या संमाजाला आजवर जो अनन्वीत जुलूम व छळ सोसावा लागला आहे त्याचे मर्म यात आहे. जर अस्पृश्य मानलेल्या समाजाच्या पूर्वजांच्या हातात शस्त्र असते तर त्याच्या बापजाद्यांनी दोन हजार वर्षे अस्पृश्यतेचा व इतर अन्य तऱ्हेचा जुलूम गोडीगुलाबीने. सोसला असता का? चातुर्वर्ण्याच्यां दुष्ट शिकवणूकीने बहुजन समाजाला शस्त्र व विद्या ही मुळी दिली नाहीत. त्यामुळे या देशाची काय स्थिती झाली आहे ? या प्रांतात एके काळी क्षत्रियांचे राज्य होते. €त्रियांच्या -हासानंतर पेशवाई उदयास आली. पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रज अंमल सुरू झाला. एकेकाळी राज्य करणारे क्षत्रिय आज कोठे आहेत ? जर पाहाल तर राज्यकारभार ज्या क्षत्रियांनी हाकावा ते क्षत्रिय डोक्यावर तांबडी पगडी गळ्यात पटटा अशी चपराशांची कामे करताना, बरेच दिसतील
ब्राह्मणांनी वेदाध्ययन करून शिकावे व शिकवावे, क्षत्रियांनी लढावे, वैश्यांनी व्यापार उदीम करावा, शूद्रांनी सेवाधर्म आचरावा, हा मनू पालटत आहे. हिंदुस्थानात प्रजासत्ताक राज्य आज प्रथमच सुरू आहे. अशा प्रसंगी राष्ट्रहीत साधून हिंदुस्थानला संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झगडा सुरू करणाऱ्या काँग्रेसने आम्ही बहुसंख्यांक गोरंगरीब शेतकऱ्यांचे, मजुरांचे पाठीराखे व कल्याणकर्ते आहोत असा कितीही टाहो फोडला तरी त्यामुळे. भुलून जाण्याइतकी ही प्रजा दुधखूळी नाही. ज्या प्रजेच्या हितासाठी कॉग्रेसने सात प्रांतात अधिकार ग्रहण केले त्याचे निरीक्षण केल्यास तुम्हास काय दिसते ? मुंबई कायदे मंडळात ११ अधिकाऱ्यांच्या जागांपैकी ६ जागा ब्राह्मणांनी बळकावल्या आहेत. मद्रास प्रांताकडे अगर बिहार प्रांतातील मंत्रिमंडळाकडे पाहिल्यास त्यात अर्धे ब्राह्मण आहेत. तीच. स्थिती इतरही प्रांतात काँग्रेसने केली आहे. तेव्हा थोडक्यात सांगावयाचे म्हणजे बहुसंख्यांक असलेल्या गोरगरीब शेतकरी व मजूर पक्षांच्या नावावर काँग्रेस ब्राह्मणांचे भूत आमच्या मानंगुटीवर लादणार असल्यास आपण सर्वांनी वेळीच सावध होणे अत्यंत जरूर आहे [