१२-२-१९३८ चातुर्वर्णामुळे हिंदुस्थानचा ऱ्हास व अध:पात झाला - Page 122

: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ८४

दिवस सत्यशोधक. नावाचा पंथ स्थापन ब्राह्मणेतरातील सुशिक्षितांनी काही

आपला नाडामुडी केला. तो पंथ नावारूपास येण्यापूर्वीच' त्यातील कार्यकर्ते

गुंडाळून काँग्रेसच्या मागे लागले. आहेत. त्यांना त्यांची शुद्ध राहिलेली दिसत नाही. महात्मा गांधीच्या राजकारणाने त्यांच्या काळात जर सर्व राजकीय सत्ता ब्राह्मणांच्या हाती जाणार असली तर अशा राजकारणास 'आग लावली पाहिजे. महात्मा गांधी राजकारणाच्या गाड्याच्या नाड्या जर शेठजी भटजींच्याँ हाती देणार असले व ब्राह्मणांचे पिशाच्च पुन्हा जिवंत करणार असले तर त्या. ब्राह्मणांचा नायनाट आपणच सर्वानी करावयास हवा आहे. हे कार्य नुसते माझे . नसून बहुसंख्यांक असलेल्या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांचे, मजुरांचे वृ मराठ्यांचे आहे... या सर्वांना संघटित करून राजकारण लढविल्यास कायदेमंडळात . जबाबदारीच्या ११ च्या ११ ही जागा ते काबीज करू शकतील. _ परंतु. यथेच्छ

जेवण झाल्यानंतर उरलेल्या खरकट्यांच्या पत्रावळी उकिरड्यावर फेकून दिल्या

असता त्या चाटण्यात आनंद मानणाऱ्या कुत्र्यासारखी त्यांची स्थिती झाली-.

आहे. -जे काही थोडे मिळेल त्यातच ले समाधान मानीत आहेत. मला ते नको आहे. ' राजकारणात समानता उत्पन्न झाली पाहिजे. इतकेच नव्हे तर एखांदा' लायक भिल्ल असल्यास तो यां प्रसंगी मुख्य प्रधान झाला पाहिजे." 'समाजात असलेला उच्च-नीच भेद कमी झाला पाहिजे. ही गोष्ट कॉग्रेसच्या हातून होणे शक्य नाही व म्हणून मी काँग्रेसमध्ये सामील होत नाही |

अनेक वेळा असे सांगण्यात येते की, महात्मा गांधींच्या पुढे गेलेले विरोधक आपला विरोध विसरून विलग होत असतात. . त्यांची बोबडी -वळते असे सांगण्यात येते... परंतु माझा अनुभव त्यांच्या अगदी विरुद्ध आहे. मी दहा वेळा महात्मा. गांधींना भेटलो आहे. पण. म्हणतात त्याप्रमाणे कोणतीच भूत-बाधा

मला .झालेली .नाही.:

गोरगरीब, शेतकरी व मजूर वर्गाच्या हितरक्षणार्थ आम्ही '' स्वतंत्र मजूर पक्ष” नावाचा पक्ष काढला आहे. या पक्षाबाबत फार पाल्हाळीक न सांगता या पक्षाच्या ज्ञानाची किल्ली, सांगेन एकाच बोली या साधुक्तीनुसार थोडक्यात सांगतो... राजकीय लढा लढविण्यासाठी काँग्रेस. आज अस्तित्वात असताना दुसरा पक्ष काढण्याचे कारण. काय ? म्हणून अनेकजण मला प्रश्‍न विचारतात. मला त्यांना इतकेच सांगावयाचे आहे की, काँग्रेस ही भांडवलवाल्यांची बटीक आहे. कारण काँग्रेसचे. आजचे सर्व थेर काँग्रेसमधील भांडवलवालेच लागेल तो पैसा पुरवून माजवित आले आहेत. अर्थात भांडवलवाल्यांचा त्याच्या