चातुर्वर्ण्यामुळे हिंदुस्थानाचा ऱ्हास व अध:पात झाला ८५
बुडाशी एकच हेतू आहे की या काँग्रेसमाफत आपले जितके हीत साधता येईल तितके साधावे. हें जरी खरे असले तरी काँग्रेसवाले बाहेरून आम्ही गोरगरीब शेतकऱ्यांसाठी व मजुरांसाठीचं स्वराज्याचा लढा लढवीत आहोत. हे ' त्यांचे म्हणणे 'मानभावीपणाचे दिसते. कारण श्रीमंत भांडवलवाले व गोरगरीब, शेतकरी व मंजूर यांचे .हितसंबंध परस्पर विरोधी असे आहेत: तेव्हा गोरगरिबांसाठी श्रीमंत भांडवलवाले पदरमोड करून आपले स्वतःचे नुकसान करून घेतील, हे संभवनीय दिसत नाही. जसे व्यवहारात आपण नेहमी पाहातो की, मांजर आणि उंदीर, साप आणि मुंगूस, लांडगा आणि शेळी यांचे निर्सगतःच वाकडे असते तसेच श्रीमंत भांडवलवाले व गरीब शेतकरी व मजूर यांचे आहे. व्यवहारात जसे मुंगूस सापास चाटताना अगर उंदीर मांजरीस पिताना अगर शेळी लांडग्याच्या मांडीवर निर्विघ्नपणे झोप घेताना आढळावयाची नाही तद्वतच श्रीमंत भांडवलवाल्यांच्या मोहबतीवर गोरगरीब, शेतकरी व मजूर यांचे हित होईल या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवून फसू नये. ही गांधींची माया आहे व म्हणून शेतकरी व मजूर यांनी भांडवलवाल्यांच्या काँग्रेस या संस्थेपासून जरा सावध राहावे इतकेच सांगावयाचे आहे, कारण जो मारवाडी गोरगरीब शेतकऱ्यास व मजूरास लुटून त्यावरच गब्बर होतो तो काय वर्षास चार आणे देऊन काँग्रेसचा
सभासद झाल्याने आपला स्वभावधर्म एकदम बदलिल हे म्हणणे हास्यास्पद
आहे. आज हरिपुरा येथे काँग्रेसचे ५१ वे अधिवेशन भरत आहे. त्यासाठी
काही लाखांनी खर्च होणार असे म्हणतात. हा सर्व खर्च होणारा पैसा कोठून
आला ? हा सर्व पैसा श्रीमंत शेठांनी दिला आहे. याबाबत एक अनुभवाची
गोष्ट सांगतो. आमच्या कोकणात श्रीमंत मुसलमान लोक गोरगरीब लोकांच्या
मुलांची लग्ने १० वर्षे त्यांच्या येथे काम करण्याच्या कराराने करून देतात. परंतु
हे एकच लग्न नसून असल्या अनेक गरजू लोकांची लग्ने एकाच मुहूर्तावर करतात
व शेवटी मुदतीनंतर आणखी एक वर्ष लोभाचे. या सर्व लोकांना सावकाराकडे
काम करावे लागते. त्याचप्रमाणे काँग्रेस अधिवेशनासाठी लागणाऱ्या लाखो
रुपयांच्या श्रीमंतांच्या कर्जापायी या हिंदुस्थानास आणखी किती दिवस श्रीमंतांच्या
गुलामगिरीत काढावे लागतील ? तेव्हा हा लढा गोरगरीब मजूर व शेतकरी
यांनी संघटित होऊनच लढविला पाहिजे. स्वतंत्र मजूर पक्षाचा आज मी जरी
अध्यक्ष असलो तरी मला त्याचा मोठा हव्यास नाही. दुसरा कोणी अध्यक्ष होऊन
ही जबाबदारी घेण्यास तयार असल्यास मला त्यात फार समाधान वाटेल. या
राजकारणापासून मला असा काय लाभ आहे ? मी जर यापासून दूर असतो
तर आज काही लाखांचा धनी खास झालो असतो. हिंगाला जसा वास आहे