८६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तसा आम्हास अस्पृश्यतेमुळे लागला आहे. तेव्हा अस्पृश्येतर जरी त्यामुळे बिचकून या स्वतंत्र मजूर पक्षापासून दूर राहू लागले तर त्यांची मर्जी परंतु आपल्यातील दरेक वयात आलेल्या स्त्री-पुरुषांनी या स्वतंत्र मजूर पक्षाचे वर्षाकाठी चार आणे भरून सभासद व्हावे व स्वतंत्र मजूर पक्षाची शक्ती वाढवावी अशी विनंती करून आपली रजा घेतो. पुष्पहार अर्पण झाल्यानंतर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय' च्या जयघोषात सभा विसर्जन पावली.
दुपारी ३ वाजता सटाण्याहून निघून वाटेत काझीसांगवी, ता. चांदवड येथे डॉ. बाबासाहेबांचे अभिनंदन करण्यात आले. सदर प्रसंगी सदर गावचे मराठा जातीचे प्रमुख पुढारीं श्री. कारभारी बगाजी पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांचे गुणवर्णनपर भाषण केले. |