११८
स्वातंत्र्य. समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली
नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे
मनमाड येथे अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद आयोजित करण्याविषयक भूमिका विशद करणारे रेल्वे अस्पृश्य कामगारांना
उद्देशून पत्रक काढण्यात आले होते. ते येणेप्रमाणे- |
' अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद मु. मनमाड येथे या महिन्याच्या अखेरीस भरणार आहे. ही परिषद भरण्याचे ठरविण्यापूर्वी परिषदेच्या चालक मंडळींपैकी काही प्रमुख मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गेल्या महिन्यात भेटून गेली. ही परिषद भरविण्याचे खरे कारण आजकाल जिकडे तिकडे बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हलाखीची अवस्था निर्माण झाली आहे. गोरगरीब कामगारांना या अवस्थेची तीव्र जाणीव भासत असून त्यात अस्पृश्य कामगारांच्या हालअपेष्टांना सीमाच राहिलेली नाही. . स्पृश्य वर्गीय कामगाएांपासून होणारा थोडाफार त्रास होतोच शिवाय अधिकारी वर्गाकडून होणाऱ्या त्रासाचे गाऱ्हाणे ऐकून घ्यावयास कुणी जबाबदार मंडळी नाही किंवा त्यांचे गाऱ्हाणे योग्य रीतीने अधिकारीवर्गापुढे मांडणारा खरा प्रतिनिधीही नाही. अंतःकरणाच्या खऱ्या जिव्हाळ्याशिवाय कार्य होत नसते ही सत्य गोष्ट अस्पृश्य वर्गीय कामगार बांधवांना आजपर्यंतच्या कटु अनुभवाने पूर्णपणे कळून आलेली आहे. रेल्वेचे राक्षसी काम रात्रंदिवस जिवापाड मेहनत करून करावयाचे आणि याचा मोबदला काय, तर एकवेळ पोटभर भाकरी मिळेल किवा नाही इतके अल्प वेतन मिळावयाचे ! ही कामगिरी करताना स्वतःच्या कौटुंबिक प्रपंचाकरिता कर्जबाजारी होण्याची वेळ येते ती गोष्ट निराळीच, अशी बिकट
परिस्थिती अस्पृश्यतेच्या कलंकाबरोबर अनुभवीत राहाणे दिवसेंदिवस कठिण होत
आहे. या सर्व गोष्टींचा साधकबाधकरित्या विचार करून सर्व॑ अस्पृश्य
कामगारांना एकत्रित करून आपल्या यापुढील कार्याची रूपरेषा आखण्याकरिता
काही कामगारातील प्रमुख मंडळींनी ही अखिल जी. आय, पी. रेल्वे अस्पृश्य
कामगार परिषद भरविण्याचे ठरविले आहे. | 0 1
मनमाड येथे भरणाऱ्या या उपनिर्दिष्ट परिषदेचे अध्यक्षस्थान अस्पृश्य वर्गाचे
सन्माननीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारण्याचे कबूल केले